Tina Dabi : लग्न ठरताच टीना डाबींच्या होणाऱ्या नवऱ्याची अचानक बदली; राजस्थान सरकारने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 20:50 IST2022-04-14T20:49:08+5:302022-04-14T20:50:00+5:30
आयएएस टीना डाबी (IAS Tina Dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

Tina Dabi : लग्न ठरताच टीना डाबींच्या होणाऱ्या नवऱ्याची अचानक बदली; राजस्थान सरकारने घेतला मोठा निर्णय
आयएएस टीना डाबी (IAS Tina Dabi) आणि प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघेही राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी आहेत. दरम्यान, राजस्थान सरकारने प्रशासकीय फेरबदल करताना सर्व अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदलीच्या यादीत आयएएस प्रदीप गावंडे यांचेही नाव आहे.
यापूर्वी प्रदीप गावंडे हे पुरातत्व व वस्तुसंग्रहालय (जयपूर) विभागात संचालक म्हणून कार्यरत होते. आता त्यांची पोस्टिंग सहसचिव, उच्च शिक्षण विभाग (जयपूर) येथे झाली आहे. दुसरीकडे, टीना डाबी या सध्या राजस्थान वित्त विभागात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. टीना यांच्यानंतर आता त्यांचे होणारे पती प्रदीप गावंडेही सचिवालयात आले आहेत. अलीकडेच टीना आणि प्रदीप यांनी सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. टीना डाबी यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट डिअॅक्टिव्हेट केले होते. तर प्रदीप गावंडे यांनी त्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट डिअॅक्टिव्हेट करून सोशल मीडियाला रामराम ठोकला होता.
२२ एप्रिलला विवाह
प्रदीप गावंडे यांचादेखील हा दुसरा विवाह असेल. त्यांनी चुरु जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून काम केलं आहे. आयएएस होण्याआधी प्रदीप यांनी एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचा जन्म ९ डिसेंबर १९८० रोजी महाराष्ट्रात झाला. प्रदीप आणि टीना यांचा विवाह सोहळा २२ एप्रिलला जयपूरमधील एका हॉटेलमध्ये संपन्न होईल.