रब ने बना दी जोडी! UPSC ची एकत्र तयारी, तिसऱ्या प्रयत्नात दोघेही झाले IAS; बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:47 IST2025-02-25T12:46:34+5:302025-02-25T12:47:17+5:30

बिहारमधील दोन आयएएस अधिकारी प्रवीण कुमार आणि अनामिका सिंह यांनी लग्न करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

ias success story prepared for upsc together became ias in third attempt and got married | रब ने बना दी जोडी! UPSC ची एकत्र तयारी, तिसऱ्या प्रयत्नात दोघेही झाले IAS; बांधली लग्नगाठ

फोटो - india.com

बिहारमधील दोन आयएएस अधिकारी प्रवीण कुमार आणि अनामिका सिंह यांनी लग्न करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघेही २०२० च्या बॅचचे आयएएस आहेत आणि तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाल्यानंतर ते अधिकारी बनले. गोरखपूरमध्ये त्यांचं लग्न झालं, अनेक वरिष्ठ नेते आणि अधिकारी या विवाहसोहळ्याला उपस्थित होते. प्रवीण सध्या बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील हिल्साचे एसडीएम आहेत, तर अनामिका उत्तराखंडच्या गढवाल जिल्ह्यातील एसडीएम आहेत. 

प्रवीण कुमार हे बिहारमधील जमुई येथील रहिवासी आहे. त्याच्या वडिलांचं मेडिकल स्टोअर आहे आणि आई घर सांभाळते. प्रवीण यांनी जमुई येथून इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतलं, नंतर जेईई उत्तीर्ण केली आणि आयआयटी कानपूरमधून बी.टेक केलं. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली. ते दोनदा अयशस्वी झाले, पण तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी चमत्कार केला. २०२० मध्ये त्यांना सातवा रँक मिळाला आणि ते बिहार कॅडरचे आयएएस झाले. 

अनामिका सिंह या गोपाळगंजच्या बखरी गावच्या आहेत. त्यांचे वडील सैन्यातून निवृत्त झाले आहेत, त्यांनी यमुना नगर येथील आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. बारावीनंतर पुण्यात कम्पुटर सायन्समध्ये बी.टेक केलं. मग दिल्लीत यूपीएससीची तयारी सुरू केली. बीपीएससीची परीक्षाही दिली आणि ६५ व्या परीक्षेत ८ वा रँक मिळवला. त्या UPSC मध्ये दोनदा अयशस्वी झाल्या, पण २०२० मध्ये त्याने ३४८ व्या रँकसह विजय मिळवला. ट्रेनिंगनंतर त्या उत्तराखंडच्या आयएएस झाल्या.

प्रवीण आणि अनामिका यांची गोष्य कठोर परिश्रम आणि प्रेमाचे अद्भुत प्रतिक आहे. दोघांनीही तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण केली आणि आता लग्न करून नवीन आयुष्य सुरू केलं आहे. त्यांच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि लोक त्यांच्या मेहनतीचं आणि प्रेमाचं कौतुक करत आहेत.

Web Title: ias success story prepared for upsc together became ias in third attempt and got married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.