फिर्यादीच्या प्रेमात पडले डीएम साहेब, जुनी मैत्री आठवताच केलं लग्न   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 18:39 IST2024-12-17T18:39:14+5:302024-12-17T18:39:35+5:30

IAS Officer Love Story: हल्ली अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या लव्हस्टोरी बऱ्याच चर्चेत असतात. अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान सुरू झालेल्या प्रेमप्रकरणांना विवाहापर्यंत नेत पूर्णत्व दिलेलं आहे.

IAS Officer Love Story: DM fell in love with the complainant, got married as soon as he remembered the old friendship | फिर्यादीच्या प्रेमात पडले डीएम साहेब, जुनी मैत्री आठवताच केलं लग्न   

फिर्यादीच्या प्रेमात पडले डीएम साहेब, जुनी मैत्री आठवताच केलं लग्न   

काही प्रेमकहाण्या ऐकणं, वाचणं हा खूप रोमँटिक अनुभव असतो. काही प्रेम कहाण्या ह्या पिढ्यानपिढ्यांनंतरही अगदी नव्यासारख्या वाटतात. त्यात हल्ली अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या लव्हस्टोरी बऱ्याच चर्चेत असतात. अनेक आयएएस अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणादरम्यान सुरू झालेल्या प्रेमप्रकरणांना विवाहापर्यंत नेत पूर्णत्व दिलेलं आहे. आयएएस अधिकारी संजय कुमार खत्री यांची प्रेमकहाणीही अशीच चर्चित आहे. त्यांनी उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे डीएम म्हणून काम पाहत असताना लग्न केलं होतं.  

एका फिर्यादीच्या प्रेमात पडून नंतर तिच्यासोबत विवाह केल्याने आयएएस अधिकारी संजय कुमार खत्री हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. तसेच त्यांच्यावर अनेक गंभीर आरोपही झाले होते. संजय कुमार खत्री हे २०२३ पासून नोएडा प्राधिकरणाचे अप्पर मुख्य कार्यपालक म्हणून काम पाहत आहेत. संजक कुमार खत्री आणि त्यांची पत्नी विजयालक्ष्मी यांची लव्हस्टोर फार रंजक आहे. तसेच तिची फार चर्चा होत असते.

संजय कुमार खत्री २७ मार्च २०१६ ते ७ सप्टेंबर २०१७ या काळात उत्तर प्रदेशमधील गाझीपूर शहरामध्ये डीएम पदावर होते. तिथे त्यांची भेट विजयालक्ष्मी यांच्याशी झाली होती. विजयालक्ष्मी ह्या फिर्यादी बनून एक तक्रार घेऊन डीएम यांच्या कार्यालयात आल्या होत्या. पहिल्या भेटीतच आपण यूपीएससीच्या अभ्यासादरम्यान दिल्लीत एकमेकांना भेटलो असल्याचं त्यांना आठवलं. त्यानंतर गाझीपूरमध्ये दोघेही अनेकदा भेटले. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. 

त्यानंतर संजय कुमार खत्री आणि विजयालक्ष्मी यांनी फार वेळ न दवडता विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. मात्र संजय कुमार खत्री आपण एकमेकांना ७-८ वर्षांपासून ओळखत असल्याचा चर्चा फेटाळून लावल्या. त्यावेळी हे दोघेही दिल्लीत राहून यूपीएससीची तयारी करत होते. संजय कुमार खत्री यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. तर विजयालक्ष्मी यांना अपयश आल्याने त्या गाझीपूरमध्ये परतल्या होत्या.  

Web Title: IAS Officer Love Story: DM fell in love with the complainant, got married as soon as he remembered the old friendship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.