शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

लढाऊ विमानाला पक्षी आदळला; सुरक्षित उतरण्यासाठी पायलटने बॉम्बच खाली टाकला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 4:27 PM

हवाई दलाच्या विमानांचे वारंवार होणारे अपघात भारताच्या दृष्टीनं चिंतेचा विषय झाला आहे.

अंबाला : हरियाणाच्या अंबाला हवाईदलाच्या विमानतळावर लढाऊ विमानाचा अपघात टळला. जग्वारच्या या विमानाने गुरुवारी सकाळी 7.20 मिनिटांनी उड्डाण केले होते. मात्र, काही वेळातच विमानाला पक्षी आदळला यामुळे इंजिनाला नुकसान झाले. मात्र, वैमानिकाने युक्ती लढवत विमान सुरक्षितरित्या खाली उतरविले. 

हवाई दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, पायलटने शहराच्या बलदेव नगरमध्ये विमानाच्या बाहेरची इंधन टाकी आणि 10 किलोचा सरावासाठीचा बॉम्ब खाली टाकला. हा बॉम्ब ताब्यात घेण्यात आला आहे. तर दुसरीकडे हवाईदलाच्या या अपघाताची कोर्टऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. 

ही घटना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इंधनाची टाकीचे अवशेष पडल्यामुळे जोरात आवाज झाला. आम्ही झोपेत होतो. आवाजाने जाग झाली. आजुबाजुच्या घरांमध्ये हे अवशेष पडले. यामुळे भिंतींना तडे गेले. तर डीएसपी रजनीश शर्मा यांच्यासमवेत अनेक पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही पायलटनी आपत्कालीन लँडिंग केली. तसेच अवशेष जमा करण्यात आले आहेत. 

2016 पासून 33 विमाने अपघातग्रस्तहवाई दलाच्या विमानांचे वारंवार होणारे अपघात भारताच्या दृष्टीनं चिंतेचा विषय झाला आहे. 2015-16 पासून भारतीय हवाई दलाची 33 विमानं अपघातग्रस्त झाली आहेत. यामध्ये 19 लढाऊ विमानांचा समावेश आहे, अशी आकडेवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली. रशियाकडून खरेदी करण्यात आलेलं एएन-32 विमान काही दिवसांपूर्वीच अरुणाचल प्रदेशमध्ये अपघातग्रस्त झालं. त्याचीही माहिती राजनाथ यांनी सभागृहाला दिली. हवाई दलाच्या एएन-32 विमानाला 3 जून रोजी अपघात झाला. यामध्ये हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर एएन-32 विमानाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र एएन-32 विमानं अतिशय उपयुक्त असून ती यापुढेही हवाई दलाच्या सेवेत असतील, असं राजनाथ सिंह म्हणाले. यावेळी त्यांनी 2015-16 पासून झालेल्या अपघातांचीही माहिती दिली. 2015-16 या वर्षात हवाई दलाची चार लढाऊ विमानं आणि प्रत्येकी एक हेलिकॉप्टर, वाहतूक विमान आणि प्रशिक्षणासाठी वापरलं जाणारं विमान कोसळलं, असं राजनाथ यांनी सांगितलं. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलAccidentअपघात