भाजपाशी युती करण्यापेक्षा राजकारण संन्यास घेईन- मायावती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:42 IST2020-11-03T05:07:47+5:302020-11-03T06:42:56+5:30
Mayawati : उत्तर प्रदेशातील आगामी विधान परिषद निवडणुकांत समाजवादी पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आम्ही कोणालाही अगदी भाजपलाही पाठिंबा देऊ, असे वक्तव्य मायावती यांनी गेल्या आठवड्यात केले होते.

भाजपाशी युती करण्यापेक्षा राजकारण संन्यास घेईन- मायावती
लखनऊ : भविष्यातील कोणत्याही निवडणुकांमध्ये भाजपबरोबर आम्ही कधीही युती करणार नाही, असे बहुजन समाज पक्षाच्या (बसप) प्रमुख मायावती यांनी म्हटले. तशी वेळ येण्यापेक्षा मी राजकारण संन्यास घेणे पसंत करीन, असेही त्या म्हणाल्या.
उत्तर प्रदेशातील आगामी विधान परिषद निवडणुकांत समाजवादी पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आम्ही कोणालाही अगदी भाजपलाही पाठिंबा देऊ, असे वक्तव्य मायावती यांनी गेल्या आठवड्यात केले होते. मुस्लिम मतदारांनी बसपपासून दूर जावे म्हणून काँग्रेस व समाजवादी पक्ष माझ्या वक्तव्याचा विपर्यास करीत आहेत, असा आरोप मायावती यांनी केला. त्या म्हणाल्या की, भाजप व बसपची विचारणसरणी परस्परविरोधी आहे. त्यामुळे आम्ही भाजपशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बसप सर्व धर्मांतील लोकांच्या हिताचा विचार करतो. जातीयवादी, भांडवलशाही प्रवृत्तींच्या विरोधात मी यापुढेही लढा देतच राहीन.
वक्तव्याचा पुनरुच्चार
विधान परिषद निवडणुकांत समाजवादी पक्षाच्या दुसऱ्या उमेदवाराला पराभूत करण्याची ताकद असलेल्या कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला बसप पाठिंबा देईल या वक्तव्याचा बसपच्या प्रमुख मायावती यांनी पुनरुच्चार केला.