"गो तस्कर दिसताच..."; कर्नाटकच्या मंत्र्याचा खळबळजनक इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 15:47 IST2025-02-04T15:45:27+5:302025-02-04T15:47:41+5:30
"आपण जिल्ह्यात अशा प्रकारची कामे चालू देणार नाही..."

"गो तस्कर दिसताच..."; कर्नाटकच्या मंत्र्याचा खळबळजनक इशारा!
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यात गाय चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यातच जिल्ह्याचे प्रभारी मंत्री मनकल एस. वैद्य यांनी, गो तस्करीत सामील असलेल्यांना रस्त्यावर अथवा चौकात गोळी घातली जाईल, असा इशारा दिला आहे. एवढेच नाही तर, आपण जिल्ह्यात अशा प्रकारची कामे चालू देणार नाही. प्रशासन गायी आणि गोपालकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यकत ती सर्व पावले उचलत आहे, असेही ते म्हणाले.
वैद्य यांचे हे विधान होन्नावरजवळ नुकत्याच झालेल्या एका गर्भवती गायीच्या हत्येनंतर पसरलेल्या आक्रोशानंतर आले आहे. ते म्हणाले, ‘‘गाय चोरीच्या घटना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मी एसपींना (पोलीस अधीक्षक) सांगितले आहे की, हे थांबायला हवे आणि कुठल्याही किंमतीवर असे होऊ नये. हे चूक आहे. आपण गायीची पूजा करतो. आपण गाय प्रेमाने पाळतो. आपण हिचे दूध पिऊन मोठे झालो आहोत.’’
वैद्य सोमवारी पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, "आपण पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, या गुन्ह्यात जे कुणी आढळतील त्यांच्यावर कठोर करवाई करण्यात यावी. काही जणांना अटकही झाली आहे. जर अशा घटना सुरूच राहिल्या तर, मी असे म्हणणे योग्य नाही, पण अशा आरोपींना रस्त्यात अथवा चौकात गोळी घातली जाईल, असे सुनिश्चित करावे लागेल.
काम करून कमवा... -
मंत्री म्हणाले, काम करा, कमवा आणि खा. आपल्या जिल्ह्यात रोजगाराचे अनेक पर्याय आहेत. मात्र आम्ही कुठल्याही परिस्थितीत गौ तस्करीत सामील असलेल्यांचे समर्थन करणारन नाही. अशा घटना यापूर्वीही झाल्या आहेत. तेव्हा भारतीय जनता पक्ष सरकारमध्ये होता. यासंदर्भात वैद्य यांनी, सरकारला घेण्यासाठी विरोधी पक्षावर निशाना साधा. तसेच, सत्तेत असतानाही या मुद्द्यावर गप्प बसण्याचा आरोप केला.