दीदी आहेत तोपर्यंत मी पश्चिम बंगालला जाणार नाही; बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 15:11 IST2025-10-07T15:07:04+5:302025-10-07T15:11:46+5:30
पश्चिम बंगालमध्ये कथेला परवानगी नाकारल्याबद्दल बागेश्वर धामचे मुख्य पुजारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ममता बॅनर्जी जोपर्यंत मुख्यमंत्री तोपर्यंत पश्चिम बंगालमध्ये कथेचे आयोजन करणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली.

दीदी आहेत तोपर्यंत मी पश्चिम बंगालला जाणार नाही; बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची शपथ
पश्चिम बंगालमध्ये कथेला परवानगी नाकारल्याबद्दल बागेश्वर धामचे मुख्य पुजारी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहोत तोपर्यंत मी पश्चिम बंगालमध्ये कथेचे आयोजन करणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली. दीदीची जागा दादा घेतील तेव्हा ते नक्कीच जातील, असे विधान त्यांनी केले.
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
छत्तीसगडमधील रायपूर येथे आयोजित एका कथेच्या व्यासपीठावरून बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले, "मला अलिकडेच पश्चिम बंगालला जायचे होते, पण दीदींनी मला नकार दिला; परवानगी रद्द करण्यात आली. जोपर्यंत दीदी इथे आहेत तोपर्यंत मी पश्चिम बंगालला जाणार नाही. दादा ज्यावेळी येतील जेव्हा मी जाणार, पण देवाची इच्छा असेल तर दीदींनी इथेच राहावे. आम्हाला त्यांची काहीही अडचण नाही, असेही धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
१० ते १२ ऑक्टोबर दरम्यान कोलकाता येथे आयोजन होते
बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची कथा १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान कोलकाता येथे होणार होती. पण, पावसाचे पाणी साचल्यामुळे, पश्चिम बंगाल सरकारने परवानगी रद्द केली. यामुळे धीरेंद्र शास्त्री नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”
गेल्या काही दिवसांपासून ‘आय लव्ह मोहम्मद’ यावरून देशभरात आरोप-प्रत्यारोप सुरू होत आहेत. ‘आय लव्ह मोहम्मद’ याला प्रत्युत्तर म्हणून ‘आय लव्ह महादेव’ सुरू करण्यात आले. या वादात आता बागेश्वर धाम सरकार आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी उडी घेत मोठे विधान केले. उत्तर प्रदेशात सध्या पदयात्रा करून आलो. संपूर्ण देशात भ्रमण करणार आहे. हिंदूविरोधी घटकांना एकतर हद्दपार करू किंवा घरी पाठवू, असे बाबा बागेश्वर यांनी म्हटले आहे.
‘आय लव्ह मोहम्मद’ यावरून बरेलीमध्ये खूप गोंधळ उडाला होता. यावर धीरेंद्र शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली. 'आय लव्ह मोहम्मद' मध्ये काही चुकीचे नाही आणि 'आय लव्ह महादेव' मध्ये काही वाईट नाही. पण जर तुम्ही धडापासून शीर वेगळे करण्याचा नारा दिला तर, या देशाचा कायदा तुम्हाला सोडणार नाही आणि या देशातील हिंदूही तुम्हाला सोडणार नाहीत, असे धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.