शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Punjab Political Crisis : राजीनाम्यानंतर सिद्धूंची पहिली अन् थेट प्रतिक्रिया; व्हिडिओ जारी करत साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 11:59 IST

पंजाबमध्ये मंगळवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेससमोर आता नवे संकट उभे राहिले आहे.

पंजाबमध्ये राजकीय गोंधळ सुरू असतानाच नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला आहे. यात, आपण शेवटच्या श्वासापर्यंत हक्क आणि सत्याची लढाई लढत राहणार. तसेच नैतिकतेशी कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाही, असे सिद्धूंनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर भ्रष्ट मंत्र्यांना पुन्हा आणण्याचा निर्णय आपण कधीही स्वीकारणार नाही, असेही सिद्धू यांनी म्हटले आहे. (I will keep fighting the fight for truth till my last breath says Navjot singh sidhu day after resignation as punjab congress chief)

सिद्धू म्हणाले, 17 वर्षांचा राजकीय प्रवास एका उद्देशाने केला. पंजाबमधील नागरिकांचे जीवन सुधारणे आणि एखाद्या मुद्द्यावरील राजकारनावर एक स्टँड घेऊन उभे राहणे, हाच माझा धर्म आहे आणि हेच माझे कर्तव्यही आहे. माझे काही वैयक्तिक भांडण नाही. मात्र, माझी लढाई मुद्द्यांची आहे. पंजाबच्या भल्यासाठी उभे राहणे हा माझा अजेंडा आहे आणि मी त्याच्याशी तडजोड करू शकत नाही आणि मी सत्यासाठी लढत राहणार.

...म्हणून सिद्धू नाराज -पंजाबमध्ये मंगळवारी नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर काँग्रेससमोर आता नवे संकट उभे राहिले आहे. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबमधील त्यांच्या जवळच्याच एका मंत्र्याने मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या मंत्रिमंडळातूनही राजीनामा दिला आहे. मानले जाते की, पंजाबमधील नव्या मंत्रिमंडळात आपल्या लोकांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आणि उच्च पदांवर आपल्या लोकांची पोस्टिंग न केल्याने सिद्धू नाराज आहेत आणि यामुळेच त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे पंजाबचे राजकारण ढवळून निघत आहे. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाबcongressकाँग्रेस