"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 19:54 IST2025-05-24T19:51:37+5:302025-05-24T19:54:36+5:30
Tej Pratap Yadav Anushka Yadav: लालू प्रसाद यादव यांचे यांचे सुपुत्र तेज प्रताप यादव यांनी एक फोटो पोस्ट केला आणि अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली.

"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
Tej Pratap Yadav Anushka Yadav News: राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी शनिवारी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खास गोष्ट समर्थक, चाहत्यांना सांगितली. मला बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती की आम्ही १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत, असे ते म्हणाले. पण, काही वेळाने त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. नेमकं या पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तेज प्रताप यादव यांनी एक फोटो शेअर केला, ज्यात त्यांच्यासोबत एक महिला दिसत आहे. या महिलेचे नाव अनुष्का यादव असे आहे.
प्रेमाची कबुली, तेज प्रताप यादवांनी काय म्हटलं आहे?
तेज प्रताप यादव यांनी फेसबुकवर अनुष्का यादव यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आणि त्यांच्या प्रेमाच्या नात्याबद्दल माहिती दिली.
पोस्टमध्ये तेज प्रताप यादवांनी म्हटलं होतं की, "मी तेज प्रताप यादव आणि माझ्यासोबत या फोटोमध्ये ज्या दिसत आहेत, त्यांचे नाव अनुष्का यादव आहे. आम्ही दोघे मागील १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि प्रेम करतो."
वाचा >>वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
"आम्ही दोघं मागील १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहत आहोत. मला बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला ही गोष्ट सांगायची होती. पण, कळत नव्हतं की, कसं सांगू? त्यामुळे आज या पोस्टच्या माध्यमातून माझ्या मनातील गोष्ट तुम्हाला सांगत आहे. आशा करतो की तुम्ही माझ्या भावना समजून घ्याल", असे तेज प्रताप यादव या पोस्टमध्ये म्हणाले.
तेज प्रताप यादवांनी पोस्ट केली डिलीट
तेज प्रताप यादव यांची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली. ३.७ हजार लोकांनी ही पोस्ट लाईक केली. १.२ हजार लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आणि १५४ लोकांनी ही पोस्ट शेअरही केली. पण काही वेळाने त्यांनी ही पोस्ट डिलीट केली.
परदेशात आहेत तेज प्रताप यादव
तेज प्रताप यादव सध्या परदेशात आहेत. ते मालदीवमध्ये वेळ घालवत आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर समुद्र किनाऱ्यावरील ध्यान करतानाचा व्हिडीओही शेअर केला होता. हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.