"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:46 IST2025-11-15T15:20:16+5:302025-11-15T15:46:19+5:30

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयानंतर, सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग आला आहे. एलजेपी प्रमुख केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली, यावेळी विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. चिराग पासवान यांनी हा बिहारच्या लोकांचा आणि त्यांच्या शहाणपणाचा विजय असल्याचे म्हणाले.

"I want Nitish Kumar to become the Chief Minister...", Chirag Paswan clearly stated on the post of CM of Bihar | "मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले

"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने मोठा विजय मिळवला. या विजयानंतर नवीन सरकार स्थापनेची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शनिवारी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली. नितीश कुमार यांनी त्यांचे स्वागत केले.  यावेळी नितीश कुमार यांच्या चेहऱ्यावर निवडणूक निकालाचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.

या निवडणुकीत जेडीयूने ८५ जागा जिंकल्या, तर चिराग पासवान यांच्या पक्षाने १९ जागा जिंकल्या. दरम्यान, भाजप ८९ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला. चिराग पासवान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नीतीश कुमार यांच्या भेटीचे फोटो शेअर केले. "बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, मी आज बिहारचे माननीय मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आणि एनडीएच्या प्रचंड विजयासाठी माझे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या", असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?

जनतेने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला: चिराग पासवान

चिराग पासवान म्हणाले की, बिहारच्या जनतेने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. हा विजय केवळ कोणत्याही पक्षाचा नाही, तर बिहारच्या जनतेचा आणि त्यांच्या शहाणपणाचा आहे. लोक जनशक्ती पक्षाने ज्या आत्मविश्वासाने निवडणूक लढवली त्याचे जनतेने कौतुक केले.'एनडीए युतीच्या काळात बिहारचा विकास वेगवान होईल. राज्यातील तरुण, महिला आणि मागासवर्गीयांसाठी काम करण्यावर असेल, असंही पासवान म्हणाले.

यावेळी चिराग पासवान यांना मुख्यमंत्रि‍पदाबाबत प्रश्न केला. यावेळी ते म्हणाले, अमित शहा म्हणाले होते की विधिमंडळ पक्ष मुख्यमंत्री निवडेल. त्यांनी सांगितले की त्यांना नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. २०२० च्या निकालांचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या पराभवासाठी अनेक लोक जबाबदार होते. जेडीयूशी मतभेद दाखवण्यासाठी, अफवा पसरवल्या जात होत्या, असेही पासवान म्हणाले.

Web Title : नीतीश कुमार ही मुख्यमंत्री बनें: चिराग पासवान ने किया स्पष्ट

Web Summary : बिहार में एनडीए की जीत के बाद, चिराग पासवान ने नीतीश कुमार से मुलाकात की और उन्हें बधाई दी। भाजपा ने सबसे अधिक सीटें जीतीं, लेकिन पासवान ने कुमार को मुख्यमंत्री बने रहने की इच्छा व्यक्त की, और जनता के निर्णय का सम्मान किया।

Web Title : I want Nitish Kumar to be CM: Chirag Paswan clarifies

Web Summary : Following NDA's Bihar victory, Chirag Paswan met Nitish Kumar, congratulating him. While BJP won the most seats, Paswan expressed his desire for Kumar to remain Chief Minister, emphasizing public's wise decision and development focus.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.