"मला नयनतारा हवीय.. देऊ शकता?" दक्षिणेत भलतंच राजकारण; मुख्यमंत्री 'स्वप्न सांगा' म्हणाले, खासदाराने नायिकेचेच नाव घेतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 16:48 IST2026-03-17T16:38:36+5:302026-03-17T16:48:30+5:30

AIADMK Leader on Nayanthara: तमिळनाडूमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या अण्णा द्रमुक पक्षाच्या एका नेत्याने केलेल्या ...

"I want Nayantara.. can you give it to me?" Bad politics in the South; Chief Minister said 'Tell me your dream', MP took the heroine's name | "मला नयनतारा हवीय.. देऊ शकता?" दक्षिणेत भलतंच राजकारण; मुख्यमंत्री 'स्वप्न सांगा' म्हणाले, खासदाराने नायिकेचेच नाव घेतले

"मला नयनतारा हवीय.. देऊ शकता?" दक्षिणेत भलतंच राजकारण; मुख्यमंत्री 'स्वप्न सांगा' म्हणाले, खासदाराने नायिकेचेच नाव घेतले

AIADMK Leader on Nayanthara: तमिळनाडूमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या अण्णा द्रमुक पक्षाच्या एका नेत्याने केलेल्या वादग्रस्त विधानाने मोठा वाद निर्माण झालाय. तामिळनाडूचे माजी मंत्री आणि खासदार सी. व्ही. षण्मुगम यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री नयनतारा हिच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिप्पणी केली. महत्त्वाचे म्हणजे, महिलांच्या रक्षणासाठी आयोजित केलेल्या आंदोलनातच त्यांनी हे विधान केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

तामिळनाडूमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत एआयएडीएमकेने विल्लुपुरम येथे एका निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्या एका विधानाचा समाचार घेताना षण्मुगम यांनी मर्यादा ओलांडली. मुख्यमंत्री स्टालिन यांनी अलीकडेच जनतेला त्यांचे स्वप्न सांगण्याचे आवाहन केले होते, जे पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते.

यावर टीका करताना षण्मुगम म्हणाले, "डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्याला स्वप्न पाहायला सांगितले होते. स्टालिनही म्हणतात तुमची स्वप्ने सांगा. आता जर मी स्वप्न पाहिले की मला नयनतारा हवी आहे, तर स्टालिन माझे हे स्वप्न पूर्ण करतील का? जर एखाद्याने नयनतारासोबत लग्न लावून देण्याची मागणी केली, तर मुख्यमंत्री ते स्वप्न पूर्ण करणार का?"

नेटकऱ्यांचा संताप आणि टीका

षण्मुगम हे विधान करत असताना स्टेजवर उपस्थित असलेले इतर नेते त्यावर हसत होते, ज्यामुळे संताप अधिकच वाढला आहे. सोशल मीडियावर या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. "महिलांच्या सुरक्षेसाठी लढण्याचा दावा करणाऱ्यांच्या मनात महिलांबद्दल किती घाणेरडे विचार आहेत, हेच यातून दिसते," अशी टीका एका युजरने केली आहे. दुसऱ्या एका युजरने, "नयनतारा विवाहित आहे, तिला मुले आहेत, तरीही राजकारणी तिचा असा उल्लेख करत आहेत, हे अत्यंत लज्जास्पद आहे," अशा शब्दांत  आपला रोष व्यक्त केला.

जयललितांच्या फोटोंचा दिला संदर्भ

काही युजर्सनी अण्णा द्रमुकच्या नेत्यांना त्यांच्याच पक्षाच्या दिवंगत नेत्या जयललिता यांची आठवण करून दिली. "खिशात एका कर्तृत्ववान महिला नेत्याचा (जयललिता) फोटो ठेवायचा आणि व्यासपीठावर मात्र महिलांचा असा अपमान करायचा, हा कसला दुटप्पीपणा?" असा सवाल विचारला जात आहे.

कारवाईची मागणी

या प्रकरणावरून तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, तामिळनाडू पोलिसांनी खासदारावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Web Title : नयनतारा पर AIADMK नेता की अभद्र टिप्पणी, तमिलनाडु में आक्रोश।

Web Summary : AIADMK नेता सी.वी. षण्मुगम की अभिनेत्री नयनतारा पर अभद्र टिप्पणी से विवाद खड़ा हो गया। उन्होंने सवाल किया कि क्या मुख्यमंत्री उनसे शादी करने का सपना पूरा करेंगे, जिससे व्यापक निंदा और कार्रवाई की मांग हो रही है।

Web Title : AIADMK leader's lewd comment on Nayanthara sparks outrage in Tamil Nadu.

Web Summary : AIADMK leader C.V. Shanmugam's derogatory remarks about actress Nayanthara during a women's safety protest ignited controversy. He questioned if the CM would fulfill a dream of marrying her, drawing widespread condemnation and calls for action.