मी तुमचा मोबाईल चोरलाय, पैसे द्या आणि घेऊन जा! चोरट्याची अजब ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 12:14 IST2018-04-10T12:14:58+5:302018-04-10T12:14:58+5:30
बदलत्या काळाबरोबर आता चोरही भलतेच स्मार्ट होऊ लागले आहेत. अशाच एका चोरट्याने हुशार चोरट्याने एका घरातून मोबाईल चोरले.

मी तुमचा मोबाईल चोरलाय, पैसे द्या आणि घेऊन जा! चोरट्याची अजब ऑफर
फरिदाबाद - बदलत्या काळाबरोबर आता चोरही भलतेच स्मार्ट होऊ लागले आहेत. अशाच एका चोरट्याने हुशार चोरट्याने एका घरातून मोबाईल चोरले. त्यानंतर या चोराने त्या घरातील मंडळींना "मीच तुमचे मोबाइल चोरले आहेत. तुम्हाला मोबाइल परत हवे असतील तर पैसे द्या आणि मोबाइल घेऊन जा, अशी अजब ऑफर फोनवर दिली." त्यानंतर संबंधिक कुटुंबीयांना पोलिसांशी संपर्क साधला आणि सापळा रचून या चोरांना बेड्या ठोकल्या.
फरिदाबादमघील बलवंत कॉलनीमधील एका घरातील तीन मोबाईल चोरट्यांनी चोरले. मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात येताच या कुटुंबातील व्यक्तींनी चोरीस गेलेल्या मोबाईलवर कॉल केला. मात्र हा कॉल चोरट्यांनी रिसिव्ह केला. तसेच "मीच तुमचे मोबाइल चोरले आहेत. तुम्हाला मोबाइल परत हवे असतील तर पैसे द्या आणि मोबाइल घेऊन जा, अशी अजब ऑफर दिली." त्यानंतर या कुटुंबातील मंडळींनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून प्रकाराची माहिती दिली. मग पोलिसांनी सापळा रचून चोरांना पकडण्याची तयारी केली. चोरांनी सांगितल्याप्रमाणे घरातील व्यक्ती त्यांना पैसे देण्यासाठी गेली. मात्र तेथे आधीच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी पैसे घेण्यासाठी आलेल्या दोन चोरांना ताब्यात घेतले.
या चोरांची कसून चौकशी केली असता त्यांची संपूर्ण टोळी असल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र ताब्यात घेतलेल्या व्यक्तींच्या अटकेला पोलीस आणि क्राइम ब्रँचने दुजोरा दिलेला नाही.