‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 17:34 IST2025-12-10T17:34:17+5:302025-12-10T17:34:42+5:30
Chhattisgarh Crime News: मी तुमचं स्वप्न पाहिलंय... कॉल करा ना..., असे वेगवेगळे मेसेज असलेलं छत्तीसगडमधील एक महिला डीएसपी आणि एका कोट्यधीश उद्योगपतीचं व्हॉट्सअॅप चॅट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिला डीएसपी कल्पना वर्मा आणि उद्योगपती दीपक टंडन यांच्यातील हे चॅट आणि त्यांचं प्रेमप्रकरण आणि लव्ह ट्रॅप सध्या चर्चेचा विषय ठरलेले आहेत.

‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
मी तुमचं स्वप्न पाहिलंय... कॉल करा ना..., असे वेगवेगळे मेसेज असलेलं छत्तीसगडमधील एक महिला डीएसपी आणि एका कोट्यधीश उद्योगपतीचं व्हॉट्सअॅप चॅट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महिला डीएसपी कल्पना वर्मा आणि उद्योगपती दीपक टंडन यांच्यातील हे चॅट आणि त्यांचं प्रेमप्रकरण आणि लव्ह ट्रॅप सध्या चर्चेचा विषय ठरलेले आहेत. तसेच या दोघांचेही फोटो, व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉट, व्हिडीओ आणि कागदपत्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. यातील उद्योगपती स्वत:ची फसवणूक झाल्याचं वाटून पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देत आहे. मात्र या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. यादरम्यान, उद्योगपती दीपक टंडन यांनी स्वत: काही व्हॉट्सअॅप चॅट लीक केले असून, त्यात पैशांची मागणी आणि पत्नीला घटस्फोट देण्याबाबतच्या संभाषणाचा समावेश आहे.
पोलीस अधिकारी कल्पना वर्मा आणि दीपक टंडन यांच्यातील हे प्रकरण आता प्रेमप्रकरणापासून पुढे जाऊन लव्ह, सेक्स, फसवणूक आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात परिवर्तीत झालं आहे. तसेच डीएसपी कल्पना वर्मा हिने प्रेमसंबंधांचा गैरफायदा घेऊन दोन कोटी रुपये आणि मौल्यमान सामान उकळल्याचा आरोप दीपक टंडन यांनी केला आहे. कल्पना वर्मा हिने आपल्याकडून दोन कोटी रोख रकमेसोबतच हीऱ्याची अंगठी, सोन्याची चेन आणि एक महागडी गाडी घेतल्याचा आरोप दीपक टंडन यांनी केला आहे. एवढंच नाही तर कल्पना वर्मा हिने माझ्या एका हॉटेलची नोंदणी तिच्या भावाच्या नावावर करून घेतली, असा आरोपही टंडन यांनी केला आहे.
दरम्यान, या व्हॉट्सअॅप चॅटमुळे माझी पत्नी त्रस्त झाली. तसेच डीएसपीसोबतच्या माझ्या संबंधांबाबत आणि व्यवहारांबाबत समजले तेव्हा घरात कलह सुरू झाला, असा दावा टंडन यांनी केला. दरम्यान, वाद वाढल्यानंतर या प्रकरणातील महिला डीएसपीने व्यावसायिक टंडन यांच्यापासून लांब राहण्यास सुरुवात केली. तर दीपक टंडन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. तसेच या तक्रारीमध्ये व्हॉट्अॅप चॅटचे स्क्रीनशॉट आणि संभाषण आणि आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावे सादर केले. या पुराव्यांमधून सदर व्यावसायिक आणि डीएसपीमधील संभाषण आणि पैशांची मागणी झाल्याचे दिसून येत आहे. एवढंच नाही तर डीएसपी कल्पना वर्मा हिने पत्नीला घटस्फोट देण्यासाठी आणि आपल्यासोबत लग्न करण्यासाठी दबाव आणल्याचा दावाही केला.