"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:02 IST2025-09-19T13:56:18+5:302025-09-19T14:02:52+5:30
Sam Pitroda News: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे निटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा मोठा वाद उदभवण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं, असे पित्रोदा यांनी म्हटले आहे.

"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे निटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा मोठा वाद उदभवण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं, असे पित्रोदा यांनी म्हटले आहे.
सॅम पित्रोदा म्हणाले की, माझ्या मते आपल्या परराष्ट्र धोरणाचं लक्ष हे शेजारील देशांवर असलं पाहिजे. आपण आपल्या शेजारील देशांसोबतचे संबंध सुधारू शकतो का? मी पाकिस्तानमध्ये राहिलो आहे, तुम्हाला सांगतो तिथे मला आपल्या घरात असल्यासारखं वाटतं. मी बांगलादेशमध्ये राहिलोय आणि नेपाळमध्येही मला घरात असल्यासारखंच वाटतं. या देशात गेल्यावर मला परदेशात असल्यासारखं कधी वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पित्रोदा यांनी राहुल गांधी यांनी Gen-Z ला केलेल्या आवाहनावरही प्रतिक्रिया दिली. मी Gen-Z ने राहुल गांधी यांच्यासोबत उभं राहावं. त्यांच्या आवाजात आपलाही आवाज मिळवावा, असे मी त्यांना सांगू इच्छितो. असे ते म्हणाले.
दरम्यान, सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त दिली आहे. भाजपा प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले की, राहुल गांधी यांचे आवडते आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमख पित्रोदा म्हणतात की, त्यांना पाकिस्तानमध्ये गेल्यावर घरात असल्यासारखं वाटतं. ही काही आश्चर्याची बाब नाही. २६/११ चा हल्ला झाल्यानंतरही यूपीएने पाकिस्तानविरोधात कुठलीही कारवाई केलेली नाही, अशी टीका भंडारी यांनी केली.