"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 08:56 IST2025-07-08T08:56:01+5:302025-07-08T08:56:25+5:30
या युवकाचं लग्न एका वर्षापूर्वीच झालं होतं. पत्नी त्याला मारहाण करते आणि गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप पतीने केला आहे.

"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
एकीकडे पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना समोर येत असतानाच आता उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये पत्नीच्या दहशतीचं एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळलेल्या एका पतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देत इच्छा मरणाची मागणी केली आहे.
या युवकाचं लग्न एका वर्षापूर्वीच झालं होतं. पत्नी त्याला मारहाण करते आणि गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप पतीने केला आहे. हा युवक हातात एक फलक घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला होता.
लग्न झालं अन्...
मुजफ्फरनगरच्या गांधीनगर कॉलनीत राहणाऱ्या सुमित सैनीचं लग्न १ जुलै २०२४ रोजी जिल्ह्यातील कुकडा गावात राहणाऱ्या पिंकीशी झालं होतं. सुमितचा आरोप आहे की, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नीने त्याला सांगितलं की, हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झालं आहे आणि ती दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते. त्यानंतर पिंकीने घरात सतत भांडणं करायला सुरुवात केली. ती रोज पतीला मारहाण करायची आणि त्याला मारण्याच्या इराद्याने ती सुमितचा गळाही आवळायची.
भाडोत्री गुंडांकडून पत्नीने करवली मारहाण
पीडित पती सुमितने हेही सांगितलं की, पिंकी गेल्या ६ महिन्यांपासून माहेरी राहत आहे, पण या काळातही ती फोनवरून त्याला सतत धमक्या देत असते. त्याचबरोबर गुंडांना पाठवून त्याला मारहाणही करायची. यामुळे त्रस्त आणि हताश होऊन सुमितने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून इच्छामरणाची मागणी केली. यावेळी सुमितने हातात एक फलक धरला होता, ज्यावर त्याने आपल्या समस्या लिहिल्या होत्या.
मला इच्छामरण द्या!
पीडित पती सुमित सैनी म्हणाला, "मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आपल्या मुख्यमंत्र्यांकडे मी इच्छामरणाची मागणी करतो. मी माझ्या पत्नीमुळे खूप त्रस्त झालो आहे. माझी पत्नी मला खूप त्रास देत आहे. माझं लग्न १४ जुलै २०२४ रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार हुंड्याशिवाय झालं होतं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी पत्नी म्हणाली की, मी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करते. माझ्या आई आणि मामांनी माझं लग्न जबरदस्ती तुझ्याशी लावून दिलं आहे." पत्नीने लग्नानंतर लगेचच मारहाण आणि शिवीगाळ करायला सुरुवात केली, असा आरोपही पतीने केला आहे.