शहरं
Join us  
Trending Stories
1
राजा रघुवंशीच्या घरी गेला आरोपी सोनमचा भाऊ, म्हणाला- माझ्या बहिणीला फाशी द्या....
2
'अख्ख्या जगाला बोलवलं, एक तास आधी पत्र दिलं..'; कर्नाटक सरकारने RCB-BCCI वर फोडलं खापर
3
लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल
4
"होय, पती राजाच्या हत्येच्या षडयंत्रात मी सहभागी होते..."; सोनम रघुवंशीचा कबुलीनामा
5
करून दाखवलं! लग्नाच्या ४ वर्षानंतर पुन्हा सुरू केलं शिक्षण; पतीने सांभाळलं मूल, 'ती' झाली IAS
6
"...तरच संबंध प्रस्थापित करू देईन!"; सोनम रघुवंशीने राजा समोर ठेवली होती 'ही' एक अट, राजला केला होता असा मेसेज
7
हातात चिप्स अन् कोल्ड्रिंक; चार मुलांसह बाप रुळावर राहिला उभा, मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस येताच उडाल्या चिंधड्या
8
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहचा नवा फोटो आला समोर; सर्व गुपितं झाली उघड
10
बॉलिवूडच्या 'या' चित्रपटावरून सोनमला सुचला राजाच्या हत्येचा कट; भाऊ सचिन रघुवंशीचा मोठा दावा
11
प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!
12
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण
13
Gold Rates Today: सोन्याच्या दरात घसरण, चांदीही झाली स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगरला कुणी दुखावलं? का विचारावा लागला 'तो' प्रश्न?
15
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
16
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
17
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
18
ना निधी, ना सुविधा-अपमान झाले खूप, भारतीय महिला आइस हॉकी संघानं जिंकलं देशासाठी पहिलं पदक
19
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
20
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल

'मला या कारमध्ये प्रवास करायला आवडत नाही, माझी कार मारुती 800...', योगींच्या मंत्र्याने मनमोहन सिंग यांचा किस्सा सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 09:04 IST

उत्तर प्रदेशचे मंत्री असीम अरुण यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत आठवणी सांगितल्या आहेत.

देशाच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारे तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताला नवीन उंची मिळवून देणारे माजी पंतप्रधान तसेच ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे वयाच्या ९२व्या वर्षी गुरुवारी रात्री कालवश झाले. त्यांच्या निधनामुळे देशाने एक अर्थऋषी गमावला. देशभरातून मोठ्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. तर अनेक नेत्यांनी सिंग यांच्या आठवणी सांगितल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मंत्री असीम अरुण यांनीही आठवणी शेअर केल्या आहेत. असीम अरुण आधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे अंगरक्षक होते, त्याकाळातील त्यांनी एक किस्सा सांगितला आहे. या आठवणीतून डॉ. मनमोहन सिंग यांचा साधेपणा समोर येतो.

अर्थऋषी कालवश; आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन, ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा

डॉ. मनमोहन सिंग २००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान होते. त्यावेळी त्यांचे मुख्य अंगरक्षक म्हणून असीम अरुण हे तैनात होते. ते मुख्य अंगरक्षक असल्या कारणामुळे त्यांचा आणि सिंग यांचा रोजच संपर्क असायचा. यावेळी घडलेल्या आठवणी असीम अरुण यांनी फेसबुकवर लिहिल्या आहेत.  मंत्री असीम अरुण यांनी  फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये असीम अरुण म्हणाले की,  मी २००४ पासून जवळपास तीन वर्षे त्यांचा बॉडीगार्ड होतो. एसपीजीमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी सर्वात आतील सुरक्षा घेरा असतो, क्लोज प्रोटेक्शन टीम (सीपीटी), ज्याचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली होती. एआयजी सीपीटी तो व्यक्ती असतो, जो पंतप्रधानांपासून कधीही दूर राहू शकत नाही. जर फक्त एकच बॉडीगार्ड पंतप्रधानांसोबत राहू शकतो, तर तो हा व्यक्ती असेल. अशा प्रकारे, त्यांच्यासोबत सावलीसारखे राहण्याची जबाबदारी माझी होती.

डॉ.साहेबांची स्वतःची एकच कार होती - मारुती 800, जी पीएम हाऊसच्या आत चमचमणाऱ्या काळ्या बीएमडब्ल्यूच्या मागे उभी असायची. मनमोहन सिंग साहेब वारंवार मला म्हणायचे, "असीम, मला या गाडीत (बीएमडब्ल्यू) बसायला आवडत नाही, माझी गाडी ही आहे (मारुती)." मी त्यांना समजावायचो, "सर, ही गाडी तुमच्या वैभवासाठी नाही, तर तिचे सुरक्षा फीचर्स पाहून एसपीजीने ती घेतली आहे." पण जेव्हा कारकेड मारुतीसमोरून जायचा, तेव्हा ते नेहमी तिला प्रेमाने पाहायचे, जणू ते आपले ठाम निश्चय पुन्हा पुन्हा सांगत असायचे, "मी मध्यमवर्गीय माणूस आहे आणि सामान्य लोकांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. कोट्यवधींची गाडी पंतप्रधानांची आहे, पण माझी गाडी ही मारुती आहे."

डॉ. मनमोहन सिंग २६ डिसेंबर रोजी अचानक घरी बेशुद्ध पडले, त्यांनी रात्री ८.०६ वाजता दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले. यानंतर एम्सने एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात सिंग यांच्या मृत्यूची घोषणा केली.

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगcongressकाँग्रेस