शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

माझं ऐकायचं नसेल, पण महात्मा गांधींचं तरी ऐका; पंतप्रधानांचा काँग्रेसला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 16:50 IST

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीवरुनही मोदींनी काँग्रेससह विरोधकांचा समाचार घेतला.

नवी दिल्ली: सीएए, एनआरसी  हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावरून काँग्रेससह विरोधकांवर निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी भाषणातून काँग्रेसला महात्मा गांधी यांची आठवण करुन दिली. पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाना असुरक्षित वाटल्यास, त्यांच्यावर अत्याचार झाल्यास त्यांना सन्मानानं भारतात घ्या, असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. काँग्रेसला माझं ऐकायचं नसेल, पण त्यांनी किमान गांधींनी सांगितलेली गोष्ट तरी ऐका असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. तसेच पाकिस्तानातील अल्पसंख्यांकाना  भारताचं नागरिकत्व देण्याची भूमिका मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान असताना मांडली होती. मग आम्ही त्यापेक्षा काय वेगळं करतोय?, असा सवाल देखील नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थित केला. 

एनआरसीचा विषय ना संसदेत आलाय ना मंत्रिमंडळात, तरीही यावरुन लोकांची दिशाभूल करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेवरुन आम्ही आसाममध्ये एनआरसीची अंमलबजावणी केली. मात्र तरीही या मुद्द्यावरुन जनतेच्या मनात भीती आणि दहशत निर्माण करण्याचं विरोधकांकडून केलं जात आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. 

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात आंदोलनं सुरू असताना काँग्रेसचे नेते शांततेचं आवाहन करत नाहीत. याचा अर्थ त्यांची आंदोलनातील हिंसेला मूकसंमती आहे. सार्वजनिक मालमत्तांवर होणाऱ्या हल्ल्यांना त्यांचा पाठिंबा आहे, असं म्हणत मोदींना काँग्रेसवर तोफ डागली. आंदोलनातील हिंसाचारातून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात आहे. करदात्यांचा पैसा वाया घालवला जात आहे. पण यातून काय साधलं जाणार, गरिबांची वाहनं जाळून काय मिळणार, असे प्रश्न मोदींनी विचारले. तुम्हाला माझ्यावर राग काढायचा असल्यास माझे पुतळे जाळा, त्याला जोडे मारा, असं मोदी म्हणाले. 

 भाजपाचे 2014 मध्ये सरकार सत्तेत आल्यानंतर मी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधाला आमंत्रण दिले होते. आम्ही नव्याने मित्र म्हणून हात पुढे केला होता. तसेच मी स्वत: लोहोरमध्ये गेलो होतो, परंतु त्या बदल्यात पाकिस्तानकडून आम्हाला धोका मिळाला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर केली आहे.

भारताचे जगातल्या अनेक मुस्लिम राष्ट्रांसोबत चांगले संबंध आहेत. तसेच गेल्या 5 वर्षात मुस्लीम देशांनी अनेक भारतीय कैद्यांना सोडलं असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना नवं आयुष्य मिळणार असल्याचे देखील नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाMahatma Gandhiमहात्मा गांधीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकIndiaभारतPakistanपाकिस्तान