शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

माझी सुटका करुन सरकारने उपकार केले नाही - आलम

By admin | Updated: March 8, 2015 19:22 IST

माझी सुटका करुन जम्मू काश्मीर सरकारने माझ्यावर उपकार केलेले नाहीत असे विधान करत फुटीरतावादी नेता मसरत आलमने आगीत तेल ओतले आहे.

ऑनलाइन लोकमत 
श्रीनगर, दि. ८ - जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेते मसरत आलमच्या सुटकेवरुन वाद निर्माण झाला असतानाच माझी सुटका करुन जम्मू काश्मीर सरकारने माझ्यावर उपकार केलेले नाहीत असे विधान करत आलमने आगीत तेल ओतले आहे. आलमवर देशाविरोधात युद्ध पुकारणे आणि अन्य स्वरुपातील डझनभर गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मसरत आलमचीही शनिवारी सुटका करण्यात आली आहे. २०१० मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. आलमची माहिती देणा-या तत्कालीन सरकारने १० लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले होते. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्याने सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे. तुरुंगातून सुटल्यावर आलमने स्थानिक प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये वादग्रस्त विधान केले. माझी सुटका कायद्यानुसारच झाली असून पीडीपी - भाजपा सरकारने माझ्यावर कोणतेही उपकार केले नाही असे त्याने सांगितले. माझ्या सुटकेवर जर कोण गदारोळ उठवत असेल तर ती त्यांची डोकेदुखी आहे असेही त्याने म्हटले आहे. सरकार बदलले असले तरी प्रत्यक्षातील परिस्थिती कधीच बदल नाही असे सांगत त्याने सत्ताधा-यांवर निशाणा साधला. 
जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी व भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन केले असून आलमच्या सुटकेने भाजपावरही टीका होत आहे. भाजपा आमदारांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतला असा दावा जम्मू काश्मीरमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष जुगल किशोर यांनी केला. मुफ्तींच्या या निर्णयाविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनीही निदर्शने केली. 
 
कोण आहे मसरत आलम ?
४४ वर्षीय मसरत आलम हा फुटिरतावादी हुर्रियतचा नेता असून तो जम्मू काश्मीरमधील मुस्लीम लीगचे अध्यक्ष आहे. आलम हा हुर्रियतचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांचा उत्तराधिकारी म्हणून ओळखला जातो.