साखरपुड्यात जेवताना चिकन उशिरा देण्यावरून झालेल्या वादात एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 10:19 IST2018-04-03T10:19:27+5:302018-04-03T10:19:27+5:30

धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे.

Hyderabad Man Killed In Fight Over Chicken Curry At Engagement Dinner | साखरपुड्यात जेवताना चिकन उशिरा देण्यावरून झालेल्या वादात एकाची हत्या

साखरपुड्यात जेवताना चिकन उशिरा देण्यावरून झालेल्या वादात एकाची हत्या

हैदराबाद- साखरपुड्याच्या कार्यक्रमात जेवताना चिकनटी डीश उशिरा देण्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये घडली आहे. हैदराबादमधील चारमिनार जवळ असलेल्या हुसेनी अलम परिसरातील एका हॉलमध्ये रात्री दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून इतरांचा शोध घेतला जात आहे

चारमिनारजवळील हुसेनी अलम परिसरात असलेल्या एका हॉलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम होता. साखरपुड्यानंतर रात्री दीडच्या सुमारास काही लोक जेवायला बसले. जेवताना त्यांना चिकन डीश द्यायला वेळ लागल्यामुळे अपमान झाल्याची भावना एका गटाला झाली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या गटाने यावर चिडवाचिडवी केली. जेवणानंतर इतर १५ लोकांना घेऊन एक जण आला. त्यांच्याकडे चाकुही होते. या गटाने कार्यक्रमाचा प्रमुख असणाऱ्या अन्वरला जबरदस्त मारहाण केली यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात सोहेल नावाचा दुसरा तरूणही गंभीर जखमी झाला.

दहशतीसाठी हॉलमध्ये असलेल्या महिलांच्या विभागामध्येही ही हल्लेखोर गेले होते. 
 

Web Title: Hyderabad Man Killed In Fight Over Chicken Curry At Engagement Dinner