काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 12:38 IST2025-05-29T12:36:16+5:302025-05-29T12:38:52+5:30

अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

'Hybrid terrorists' hiding in Kashmir Valley, two arrested from Shopian, AK-56 and ammunition seized! | काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!

काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी आता काश्मीर खोऱ्यातील सर्च ऑपरेशन आणखी तीव्र केले आहे. या दरम्यान सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळत आहे. बुधवारी रात्री एका सर्च ऑपरेशन दरम्यान सुरक्षा दलाने शोपियानमधून दोन हायब्रिड दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित आहेत. इरफान बशीर आणि उजैर सलाम अशी या दोघांची नावे असून, त्यांच्याकडून प्रचंड दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. 

पोलिसांनी बुधवारी रात्री शोपियानच्या बस्कुचन भागात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या ठिकाणी दहशतवादी लपून बसल्याचा सुगावा पोलिसांना लागला होता. यानंतर त्यांनी एक रणनिती आखून या परिसराला चारही बाजूंनी वेढा दिला आणि पोलिसांची कुमक पाहून दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. 

हत्यारे आणि दारुगोळा जप्त!

अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. दोघांकडे दोन एके-५६, ४ मॅगजिन, १०२ राऊंड गोळ्या, २ हँड ग्रेनेड आणि २ पाउच इतका मोठा साठा त्यांच्याकडे सापडला. 

अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, "सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे आणि योग्य कारवाईमुळे चकमक टळली आणि दोन्ही हायब्रिड दहशतवाद्यांना जिवंत ताब्यात घेत आले." पोलिसानी या दोन्ही दहशतवाद्यांविरोधात एफआयआर दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. काश्मीरच्या खोऱ्यातील दहशतवाद संपवण्याच्या दिशेने सैन्याची जोरदार कारवाई सुरू झाली आहे. 

हायब्रिड दहशतवादी कोण आहेत?
हायब्रिड दहशतवादी म्हणजे असे लोक ज्यांची नावे कोणत्याही दहशतवादी वॉन्टेड यादीत नसतात. मात्र, हे लोक इतके कट्टरपंथी असतात की, कोणत्याही वेळी दहशतवादी कारवाया करून पुन्हा आपल्या सामान्य जीवनाची सुरुवात करतात. अशा दहशतवाद्यांना ओळखणे कठीण  असते.     

Web Title: 'Hybrid terrorists' hiding in Kashmir Valley, two arrested from Shopian, AK-56 and ammunition seized!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.