पतीचे घराला कुलूप; कनकदुर्गा निवारागृहात, अय्यप्पा मंदिरात गेल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 05:34 IST2019-01-24T05:34:27+5:302019-01-24T05:34:40+5:30

शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश करणाऱ्या कनकदुर्गाच्या घराला कुलूप लावून पतीसह तिचे नातेवाईक दुस-या इमारतीत भाड्याच्या खोलीत राहायला गेले.

Husband's house locked; The result of being in the house of Kanakdurga shelter, Ayyappa | पतीचे घराला कुलूप; कनकदुर्गा निवारागृहात, अय्यप्पा मंदिरात गेल्याचा परिणाम

पतीचे घराला कुलूप; कनकदुर्गा निवारागृहात, अय्यप्पा मंदिरात गेल्याचा परिणाम

पेरिनतलमन्ना : शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश करणाऱ्या कनकदुर्गाच्या घराला कुलूप लावून पतीसह तिचे नातेवाईक दुस-या इमारतीत भाड्याच्या खोलीत राहायला गेले. त्यामुळे तिच्यावर आता ‘वन स्टॉप सेंटर’ या निवारागृहामध्ये आश्रय घेण्याची पाळी आली आहे.
मंदिरात प्रवेश केल्यानंतर तिच्या सासू व अन्य नातेवाईकांनी तिला मारहाण केली होती. त्यामुळे घरगुती हिंसाचारविरोधी कायद्यान्वये तिने न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली आहे. पतीच्या घरात राहण्याचा आपल्याला हक्क आहे, असे तिने म्हटले आहे. कोडिकोळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून उपचारानंतर ती आपल्या पतीच्या घरी गेली असता तिथे कुलूप लावलेले आढळले.

Web Title: Husband's house locked; The result of being in the house of Kanakdurga shelter, Ayyappa