सेक्सला नकार दिला म्हणून पत्नीने कापले पतीचे गुप्तांग
By admin | Published: March 10, 2017 12:30 PM2017-03-10T12:30:03+5:302017-03-10T12:41:14+5:30
लग्न झाल्यापासून पतीने एकदाही सेक्स केला नाही. शरीरसंबंधाला नकार देऊन पतीने आपला मानसिक छळ चालवला होता असे आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले.
![Husband's gossip cut off by wife | सेक्सला नकार दिला म्हणून पत्नीने कापले पतीचे गुप्तांग Husband's gossip cut off by wife | सेक्सला नकार दिला म्हणून पत्नीने कापले पतीचे गुप्तांग](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/oldfiles/2017-03-10~sex4_ns.jpg)
सेक्सला नकार दिला म्हणून पत्नीने कापले पतीचे गुप्तांग
Next
ऑनलाइन लोकमत
गाझियाबाद, दि. 10 - लग्नाला 10 वर्ष होऊनही पती शरीरसंबंध ठेवत नसल्याने संतापलेल्या पत्नीने पतीच लिंग कापून टाकल्याची धक्कादायक घटना गाझियाबादमध्ये घडली. मूळचे बुलंदशहरचे असलेल हे दांम्पत्य मागच्या आठवर्षांपासून गाझियाबादमध्ये रहात आहे. या जोडप्याला मुलबाळ नव्हते त्यावरुन या दोघांमध्ये सतत भांडणे व्हायची असे पोलिसांनी सांगितले.
लग्न झाल्यापासून पतीने एकदाही सेक्स केला नाही. शरीरसंबंधाला नकार देऊन पतीने आपला मानसिक छळ चालवला होता असे आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले. गुरुवारी सकाळी 9.30 च्या सुमारास पती बाथरुममधून बाहेर येताच पत्नीने किचनमधल्या सुरीने पतीच्या गुप्तांगावर वार केले. खोडा पोलिस स्टेशनमध्ये महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पतीने आपल्यासमोर काहीही पर्याय न ठेवल्याने आपण हे पाऊल उचलले असे पत्नीने सांगितले.
पीडित पती पेशाने टॅक्सी चालक आहे. मला दुस-या महिलेपासून मुल आहेत असे सांगून पती मला सतत हिणवायचा. तो माझा इतका का तिरस्कार करायचा ते मला माहित नाही असे आरोपी पत्नीने सांगितले. बुधवारी रात्री या मुद्दावरुन आमच्यात भांडण झाले. मी खूप अपमान आणि मानसिक त्रास सहन केला. मला अजून का मुलबाळ नाही हा प्रश्न जेव्हा मला नातेवाईक विचारायचे तेव्हा माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते असे पत्नीने सांगितले. जखमी पतीला नोएडाच्या जयपी रुग्णालयात दाखल केले आहे.