पत्नीच्या नकळत पतीने घरात बसवला कॅमेरा; त्यानंतर धक्कादायक प्रकार आला समोर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 14:22 IST2021-05-07T14:20:34+5:302021-05-07T14:22:05+5:30
पतीने तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेत आपल्याच पत्नीच्याविरोधात तक्रार केली.

पत्नीच्या नकळत पतीने घरात बसवला कॅमेरा; त्यानंतर धक्कादायक प्रकार आला समोर!
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओमुळे लोक आश्चर्यचकीत होतात. तर काही व्हिडीओ पोलखोल करणारे असतात. अशीच एक उत्तरप्रदेशमधील धक्कादायक घटना एका व्हिडिओमुळे समोर आली आहे.
तुमच्या घरातून सतत लहान मुलांचा रडण्याचा आवाज येत असतो, अशी तक्रार शेजारी राहणाऱ्या लोकांनी केली. त्यानंतर शेजारील राहणाऱ्या लोकांनी सांगितल्यानूसार, पतीने याबाबात पत्नीला विचारणा केली. मात्र पत्नी शेजारचे काहीही सांगत आहेत, अस सांगत तिने शेजारी राहणाऱ्या लोकांसोबतच भांडण्यास सुरुवात केली.
शेजारील लोक वारंवार दररोज लहान मुलांचा रडण्याचा आवाज येत असल्याचे सांगितल्यानंतर पतीने पत्नीला न सांगता आपल्याच घरात छुपा कॅमेरा लावला. काही दिवसांनी कॅमेऱ्यात कैद झालेले सर्व व्हिडिओ पतीने पाहिल्यानंतर त्याला थेट धक्काच बसला.
पतीने तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेत आपल्याच पत्नीच्याविरोधात तक्रार केली. कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पत्नी आपल्याच मुलांना खूप वाईट प्रकारे मारहाण करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी विचारणा केली असता, संबंधित महिलेने मुलांना मारहाण करत असल्याचे मान्य केले. मात्र का मारहाण करत होती, याबाबत महिलेने अजूनही सांगितले आहे.