पतीने धनुष्य उचलला बाण सोडला आणि पत्नीचा जीव घेतला, समोर आलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 19:36 IST2025-01-02T19:36:33+5:302025-01-02T19:36:57+5:30
Crime News: मागच्या काही दिवसांमध्य पती पत्नीमधील वादामधून घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या वार्ता सातत्याने कानावर येत आहेत. दरम्यान, ओदिशामधील क्योंझर जिल्ह्यातील हांडीभांगा गावात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.

पतीने धनुष्य उचलला बाण सोडला आणि पत्नीचा जीव घेतला, समोर आलं धक्कादायक कारण
मागच्या काही दिवसांमध्य पती पत्नीमधील वादामधून घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या वार्ता सातत्याने कानावर येत आहेत. दरम्यान, ओदिशामधील क्योंझर जिल्ह्यातील हांडीभांगा गावात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका महिलेची तिच्या पतीने धनुष्यामधून बाण सोडून हत्या केल्याचं समोर आलं आहे. मृत महिलेचं नाव चीनी मुंडा असून, कडाक्याच्या भांडणानंतर पतीने हल्ला करून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार आरोपी पती दसारा याला पत्नी चीनी हिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून पती आणि पत्नीमध्ये सातत्याने वाद व्हायचे. बुधवारी रात्रीही दोघांमध्ये असाच वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या पतीने त्याच्याकडील धनुष्यातून पत्नीववर बाण सोडला. तो छातीवर लागून चीन गंभीर जखमी झाली. तसेच रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.
पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या पती-पत्नीमध्ये गुरुवारी रात्री भांडण झालं होतं. पत्नीचे आपल्या सहकाऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय पतीला होता. त्यामुळे पतीने त्या सहकाऱ्यासोबत काम करण्यास नकार दिला. तेव्हा पत्नीने आपल्याला त्या सहकाऱ्यासोबत काम करायचं आहे, असे पत्नीने सांगितले. त्यामुळे पतीचा पारा चढला. त्याने रागाच्या भरात पत्नीवर धनुष्यबाण घेऊन हल्ला केला आणि तिला गंभीर जखमी केले. त्यातच तिचा मृत्यू झाला. आता आरोपी पतीने आपला गुन्हा कबूल केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.