पतीने केलं दुसरं लग्न; पहिल्या पत्नीला समजताच सासरच्या घरासमोर 2 मुलांसह उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 11:08 IST2023-03-16T11:07:24+5:302023-03-16T11:08:18+5:30

एका व्यक्तीने पहिल्या पत्नीसोबत राहत असताना दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

husband second marriage wife reached in laws house started hunger strike childrens | पतीने केलं दुसरं लग्न; पहिल्या पत्नीला समजताच सासरच्या घरासमोर 2 मुलांसह उपोषण

पतीने केलं दुसरं लग्न; पहिल्या पत्नीला समजताच सासरच्या घरासमोर 2 मुलांसह उपोषण

उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात एका व्यक्तीने पहिल्या पत्नीसोबत राहत असताना दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पहिल्या पत्नीला समजताच तिने मुलांसह सासरचे घर गाठून उपोषण सुरू केलं आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. पोलिसांनी महिलेला कारवाईचे आश्वासन दिले आहे. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, रॉबर्टसगंज कोतवाली परिसरातील मानपूर गावात राहणाऱ्या रीना देवी यांचा पती रजनीशसोबत वाद सुरू आहे. याबाबत गेल्या 4 वर्षांपासून न्यायालयात प्रकरण सुरू आहे. याच दरम्यान, रजनीशने झारखंडमधील पलामू जिल्ह्यातील एका मुलीशी लग्न केले. रीनाला हा प्रकार कळताच तिने सासरचे घर गाठून उपोषण व आंदोलन सुरू केले. 

उपोषणात रीनाची दोन मुलेही तिच्यासोबत सहभागी झाली होती. लोकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच महिला कल्याण विभागाचे पथक व कार्यक्षेत्र अधिकारी राहुल पांडे यांनी घटनास्थळ गाठून महिलेला समजावून सांगून पोलीस ठाण्यात आणले. त्यांनी रीनाला याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

रीना आपल्या भावासोबत माहेरी गेली. या प्रकरणाबाबत सीओ सांगतात की, तपासात महिलेच्या पतीने दुसरं लग्न केल्याचे समोर आले आहे. पीडित महिला आणि तिच्या पतीविरुद्ध न्यायालयात खटला सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल तयार करून न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: husband second marriage wife reached in laws house started hunger strike childrens

टॅग्स :marriageलग्न