CAA : विरोधातील आंदोलनात पती जबरदस्तीने पाठवत; पत्नीने केला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 15:25 IST2020-03-03T15:23:34+5:302020-03-03T15:25:24+5:30
Citizen Amendment Bill : काही लोकं पुन्हा सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करण्यासाठी महिला व पुरुषांना प्रोत्साहित करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

CAA : विरोधातील आंदोलनात पती जबरदस्तीने पाठवत; पत्नीने केला भांडाफोड
अलिगढ : अलीगढमध्ये एका महिलेने आरोप केला आहे की, तिचा नवरा तिला जबरदस्तीने सीएएच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनात सामील होण्यासाठी भाग पाडत आहे. अलीगढमधील पोलिस लोकांना समज देत आहेत की, त्यांनी विनाकारण सीएएच्या निषेधात सामील होऊ नये. यावेळी पोलिस अलिगढमधील एका घरात पोहोचले असता महिलेने तिच्या पतीवर जोरदार हल्ला चढवत हे आरोप केले आहेत. हा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.
या महिलाने आरोप केला आहे की, आठवड्याभरापासून तिचा पती तिला सीएएविरोधात सुरू असलेल्या निषेधार्थ आंदोलनात भाग घेण्यासाठी सक्तीने पाठवत आहे. महिलेने सांगितले की ती खोटे बोलत नाही. आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यासाठी माझा पती रोज माझं डोक खात आहे. मात्र आपली पत्नी खोट बोलत असल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. तर पोलिसांनी महिलेच्या पतीला पत्नीवर दबाव आणू नका अशी समज दिली आहे.
दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाने अलिगढ येथील जीवनगढ़ बायपास येथे सुरु असलेल्या सीएए आणि एनआरसी विरोधातील आंदोलकांना हटवले होते. त्यांनतर सिविल लाइन्स आणि क्वार्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही लोकं पुन्हा सीएए आणि एनआरसी विरोधात आंदोलन करण्यासाठी महिला व पुरुषांना प्रोत्साहित करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस या भागातील लोकांची भेट घेऊन अशा आंदोलनात सहभाग घेऊ नका, असे आवाहन करत आहे.