लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 21:40 IST2025-09-23T21:40:06+5:302025-09-23T21:40:46+5:30
यासंदर्भात, पतीने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार ही तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
बेंगलोरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीने पतीवर नपुंसकतेचा आरोप लावत तब्बल २ कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा आहे. यासंदर्भात, पतीने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांवर मारहाण आणि छळ केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार ही तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, ही तक्रार बेंगळुरूतील गोविंदराजनगर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने दाखल केली आहे. या व्यक्तीचे लग्न ५ मे रोजी झाले होते. लग्नानंतर तो आपल्या पत्नीसह सप्तगिरी पॅलेसमध्ये राहत होता. तक्रारीनुसार, लग्नाच्या तीन महिन्यांनंतर पत्नीने पतीवर नपुंसकतेचा संशय घेतला आणि त्याची जबरदस्तीने वैद्यकीय तपासणी केली. कारण तो विवाहानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकला नव्हता.
यासंदर्भात पतीने दावा केला आहे की, डॉक्टरांनी त्याला शारीरिक संबंधांसाठी पूर्णपणे सक्षम असल्याचे म्हटले आहे. डॉक्टरांनी त्याच्या संकोचाचे कारण मानसिक तणाव असल्याचे म्हटले असून शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, पत्नीने कथितरित्या २ कोटी रुपयांची मागणी केली आहे. तिचा दावा आहे की, पतीने लग्नानंतर दिलेली वचने पूर्ण केली नाहीत.
एवढेच नाही तर, पतीने पत्नी आणि तिच्या नातलगांवर १७ ऑगस्ट रोजी घरात घुसून मारहाण केल्याचा आरोपही केला आहे. त्यांनी आपल्या कुटुंबीयांवरही हल्ला केल्याचा दावा त्याने केला आहे. या मारहाणीनंतर पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, दोन्ही बाजूंच्या दाव्यांची सत्यता पडताळली जात आहे.