धक्कादायक! पत्नीने करवा चौथचं व्रत केलं नाही म्हणून पतीची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 11:02 IST2018-10-28T10:56:47+5:302018-10-28T11:02:08+5:30

उत्तर प्रदेशमधील मथुरेमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने करवा चौथचं व्रत केलं नाही म्हणून नाराज झालेल्या पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

husband commit suicide after his newly wed wife refused to fast | धक्कादायक! पत्नीने करवा चौथचं व्रत केलं नाही म्हणून पतीची आत्महत्या 

धक्कादायक! पत्नीने करवा चौथचं व्रत केलं नाही म्हणून पतीची आत्महत्या 

मथुरा - उत्तर प्रदेशमधील मथुरेमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने करवा चौथचं व्रत केलं नाही म्हणून नाराज झालेल्या पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मघेरा गावात शनिवारी (27 ऑक्टोबर) रात्री ही घटना घडली. दीपचंद असं 21 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. 

दीपचंदचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या पत्नीचे हे पहिले करवा चौथचे व्रत होते. मात्र तिने हे व्रत करण्यास नकार दिला. यावरून पतीपत्नीत वाद ही झाला. पत्नीच्या वागण्यामुळे नाराज झालेल्या दीपचंदने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

Web Title: husband commit suicide after his newly wed wife refused to fast