अयोध्येतील रामकुंडात पती-पत्नीचं चुंबन स्नान, भाविकांकडून पतीला मारहाण; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 17:56 IST2022-06-23T17:44:02+5:302022-06-23T17:56:46+5:30
व्हायरल व्हिडिओमध्ये पत्नी-पत्नी रामकुंडात स्नान करत असताना पती आपल्या पत्नीचे चुंबन घेतो

अयोध्येतील रामकुंडात पती-पत्नीचं चुंबन स्नान, भाविकांकडून पतीला मारहाण; व्हिडिओ व्हायरल
अयोध्या - हिंदू धर्मियांचं पवित्र तिर्थस्थान असलेल्या अयोध्या येथील शरयू नदीच्या रामकुंडात भाविक भक्त स्नान करत होते. यावेळी रामकुंडात स्नान करण्यासाठी भक्तांची गर्दी होती, गंगा स्नान करुन डुबकी लावून अनेक भक्तजन आनंद घेत होते. मात्र, बुधवारी या तिर्थक्षेत्रास्थळातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, नवविवाहित दाम्पत्यही डुबकी घेऊन स्नान करत होते. मात्र, यावेळी स्थानिकांनी त्या दाम्पत्याच्या लिला पाहून नवरोबाला चांगलाच चोप दिला.
व्हायरल व्हिडिओमध्ये पत्नी-पत्नी रामकुंडात स्नान करत असताना पती आपल्या पत्नीचे चुंबन घेतो. त्यावेळी, तिथे स्नान करण्यासाठी इतरही भाविक दिसून येतात. मात्र, नवदाम्पत्याचे हे चुंबनदृश्य पाहून त्यांना ती अश्लिलता वाटते. तसेच, पवित्र स्थानी हे चुंबनदृश्य रास न आल्याने रामकुंडात स्नान करणाऱ्या इतर भाविकांनी त्या दाम्पत्यातील पतीला चांगलाच चोप दिल्याचे व्हिडिओत दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ 15 जून रोजीचा असल्याचे समजते.
येथील रामकुंडाच पुनर्उद्धार केल्यानंतर ते पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. मोठ्या प्रमाणात भाविक या रामकुंडात स्नान करण्यासाठी जातात. याप्रकरणी एसएसपी अयोध्या यांनी व्हिडिओचा तपास करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच, हा व्हिडिओ जुना असून यासंदर्भात कुठलिही तक्रार दाखल नसल्याचेही ते म्हणाले.