शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुला-मुलीच्या हत्येनंतर पती-पत्नीची आत्महत्या; व्यावसायिक भागीदार महिलाही मृत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 18:03 IST

झियाबादमधील कृष्णा सोसायटी पाच जणांच्या मृत्यूमुळे हादरली.

नवी दिल्ली: गाझियाबादमधील कृष्णा सोसायटी पाच जणांच्या मृत्यूमुळे हादरली. पती-पत्नीने आपल्या दोन किशोरवयीन मुलांना विष देऊन स्वत: आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. व्यावसायिक भागीदार असलेल्या महिलेनेदेखील त्यांच्यासमवेत आत्महत्या केल्याने पोलीस चक्रावले आहेत. गुलशन (४५) त्यांची पत्नी परवीन (४३) व संजना (३८) यांनी मंगळवारी पहाटे कृष्णा सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. घरातच गुलशन व त्याच्या पत्नीने सोमवारी मध्यरात्री मुलगा ऋत्विक (१७) व मुलगी ऋत्विका (१८) यांना विषाचे इंजेक्शन दिले. पहाटे दोघांनी संजनासमवेत आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस आयुक्त मनीष मिश्रा यांनी दिली. संजना गुलशनची व्यावसायिक भागिदार होती. एकाचवेळी पाचही जणांचे मृतदेह आवारात ठेवल्याने संपूर्ण सोसायटीतीली लोक सुन्न झाले.

गुलशन यांनी घरी ससा पाळला होता. ससाही मृतावस्थेत आढळला. सशाचा मृत्यूदेखील विषामुळेच झाल्याचा दावा पोलिसांनी केला. संजना गुलशनची व्यावसायिक भागीदार होती. व्यवसायात सतत होणा-या नुकसानामुळे पत्नीचे गुलशनशी सतत खटके उडायचे. त्यांच्यात वाद होत असत. पोलीस घराची कसून चौकशी करीत आहेत. अनेक वस्तू फॉरेंसिक विभागाला पाठवण्यात येतील. व्यावसायिक नुकसान हेच कारण सध्या समोर दिसत असले तरी पूर्ण तपास झाल्यावरच ठामपणे सांगू, अशी माहिती पोलिसांनी दिली. मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.  गुलशन व परवीन यांचा जागीच अंत झाला होता तर संजना तेव्हा विव्हळत होती. पोलिसांनी तातडीने संजना यांना रुग्णालयात नेले. दोन तासांनी संजनाचाही मृत्यू झाला.  

घरात पोलिसांना घरी चिठ्ठी सापडली. त्यात राकेश वर्मा यांचे नाव आहे. राकेश वर्मा परवीन यांचे मेहुणे आहेत. गुलशन यांनीच ती चिठ्ठी लिहिल्याचे स्पष्ट झाले आहे. दु:खद बाब म्हणजे भिंतीवर ५००च्या नोटा गुलशन यांनी चिकटवल्या होत्या. अंत्यविधीसाठी हे पैसे वापरावे, असा उल्लेख त्यात आहे. गुलशन यांना व्यवसायात मोठा तोटा झाला. तो भरून निघत नव्हता. दिवसेंदिवस त्यांची स्थिती खालावत होती. शालिमार गार्डनसारख्या उच्चभ्रू भागातून याच ऑक्टोबरमध्ये इंदिरापूरममध्ये राहण्यास आले होते. गुलशन यांनी लोकांना दिलेले अनेक चेक बाऊन्स झाले होते. त्यातील काही गुलशन यांनी भिंतीवर चिकटवले. महत्त्वाची बाब म्हणजे राकेश शर्मा यांना केस बाऊन्सप्रकरणी तुरुंगवासही झाला आहे. गुलशनला वडिलांच्या संपत्तीतून दोन कोटी रुपये मिळाले. हे सर्व पैसे गुलशन यांनी राकेश वर्मांसमवेत व्यवसायात गुंतवले. व्यवसायात मोठा तोटा झाला. मुद्दलही गेली, उलट व्याज वाढले. लोकांची देणी वाढली. गुलशन कुमार यांनी परतफेडीसाठी चेक दिले होते. ते वारंवार बाउन्स होऊ लागले. गुलशन यांच्या घरी सापडलेले बाऊन्स चेक तब्बल एक कोटी रुपयांचे आहेत.