शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नी आणि तो..., प्रकरण पोहोचलं पंचायतीत, अखेरीस पतीनेच पत्नीचं प्रियकरासोबत लावून दिलं लग्न   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:50 IST

Bihar Relationship News: एका महिलेने भर पंचायतीत तिला पतीसोबत नव्हे तर प्रियकरासोबत राहायचं असल्याचा हट्ट धरत पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अखेरीच पत्नीच्या हट्टापुढे हरलेल्या पतीने भर पंचायतीत तिचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं.

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील वीरनामा गावात एक अजब घटना घडली आहे. येथे एका महिलेने भर पंचायतीत तिला पतीसोबत नव्हे तर प्रियकरासोबत राहायचं असल्याचा हट्ट धरत पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अखेरीच पत्नीच्या हट्टापुढे हरलेल्या पतीने भर पंचायतीत तिचं लग्न तिच्या प्रियकरासोबत लावून दिलं. आता या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार समस्तीपूर जिल्ह्यातील देसुआ गावातील रहिवासी असलेल्या महिलेचं सुमारे साडे तीन वर्षांपूर्वी वैशाली जिल्ह्यातील एका तरुणसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघांनाही दोन मुलगेही झाले. मात्र आजारपणामुळे त्यापैकी एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर हे पती पत्नी एका मुलासह सामान्य जीवन जगत होते.

याचदरम्यान, या महिलेची समस्तीपूर जिल्ह्याकील वीरनामा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या सुपौल गावातील एका तरुणासोबत सोशल मीडियावरून ओळख  झाली. तसेच हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. या नात्याची माहिती पतीला समजल्यावर घरात वाद होऊ लागले. नातेवाईक आणि ग्रामस्थांनीही या महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. 

अखेरीस या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी प्रियकराच्या गावातील पंचायतीत पंचायत बोलावण्यात आली. त्यात या महिलेने सर्वांसमोर आपल्याला प्रियकरासोबत राहायचे असल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर तिने तिच्या मुलाला पतीच्या ताब्यात दिले. तर पतीने तिचा हात पकडून तो तिच्या प्रियकराच्या हातात दिला. त्यानंतर पंचायतीमध्येच त्यांचं लग्न लावून देण्यात आलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Wife insists on lover; husband arranges marriage in village meeting.

Web Summary : In Bihar, a woman insisted on living with her lover. The husband, after failed attempts to reconcile, arranged their marriage in front of the village council. The woman handed her child to the husband and married her lover.
टॅग्स :Biharबिहारmarriageलग्नrelationshipरिलेशनशिप