माणुसकी संपली! रस्त्यावर तो मदतीची मागणी करत तडफडत होता, एकजण आला अन् मोबाईल घेऊन पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:17 IST2026-02-03T11:05:39+5:302026-02-03T11:17:08+5:30

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अचानक एक व्यक्ती रस्त्यावर कोसळला, तो व्यक्ती मदतीची मागणी करत होता. यावेळी एका व्यक्तीने बाईक थांबवून द्या व्यक्तीचा मोबाईल लंपास केला.

Humanity is over! He was crying on the street, asking for help, someone came and ran away with his mobile phone. | माणुसकी संपली! रस्त्यावर तो मदतीची मागणी करत तडफडत होता, एकजण आला अन् मोबाईल घेऊन पळाला

माणुसकी संपली! रस्त्यावर तो मदतीची मागणी करत तडफडत होता, एकजण आला अन् मोबाईल घेऊन पळाला

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्हिडीओतून आता लोकांच्यातील माणुसकी संपल्याचे दिसत आहे. एक व्यक्ती अचानक रस्त्यावर कोसळला. त्याला पडताना पाहून स्कूटरवरून आलेल्या दोन तरुणांनी त्याच्याकडे येऊन मदत करण्याऐवजी त्याचा मोबाईल फोन चोरला आणि निघून गेले. थोड्या वेळाने ते परत आले आणि त्याच्या खिशाची तपासणी केली. यावेळी त्यांना काहीही सापडले नाही. यावेळी त्यांची नजर सीसीटीव्हीवर पडली, ते पाहताच त्यांनी धूम ठोकली. पण, रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

Top Marathi News LIVE Updates: "चीनसोबतच्या सीमावादाच्या वेळी निर्णय घेण्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने जबाबदारी झटकली : संजय राऊत

या घटनेमुळे आता मानवतेबद्दल नव्याने वाद निर्माण झाला आहे. दिल्लीतील रानहोला पोलीस स्टेशन परिसरातील विकास नगर भागात शनिवारी पहाटे ४ च्या सुमारास एक व्यक्ती अचानक रस्त्यावर पडला आणि वेदनेने तो थरथर कापत होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

अचानक कोसळलेल्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असावा. अचानक, तो माणूस जमिनीवर बेशुद्ध पडल्यावर, स्कूटरवरून दोन लोक येतात, त्यावरील एकजण खाली उतरतो, त्यानंतर ते त्या माणसाचा मोबाईल फोन घेतात आणि निघून जातात.ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

त्या व्यक्तीचा मृत्यू झाला

यावेळी तो तरुण परत आला. त्याने त्यापडलेल्या व्यक्तीच्या खिशात शोध सुरू केला आणि जेव्हा त्याला काहीही सापडले नाही तेव्हा तो निघून जाऊ लागला. अचानक त्याला जवळच एक सीसीटीव्ही कॅमेरा दिसला. ते पाहून तो घटनास्थळावरून पळून गेला. रस्त्यावर पडलेला व्यक्ती तासभर तडफडत होता. अखेर त्याचा मृत्यू झाला. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास परिसरातील लोक जमू लागले तेव्हा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला.

Web Title : इंसानियत शर्मसार: सड़क पर गिरे व्यक्ति की मदद की बजाय मोबाइल चोरी, मौत।

Web Summary : दिल्ली में मानवता को झकझोर देने वाली घटना सामने आई। सड़क पर गिरे व्यक्ति की मदद करने के बजाय दो चोरों ने उसका मोबाइल चुरा लिया। वे वापस आए, तलाशी ली और सीसीटीवी देखकर भाग गए। समय पर मदद न मिलने से व्यक्ति की मौत हो गई। सीसीटीवी में कैद हुई घटना।

Web Title : Humanity lost: Man collapses, thief steals phone, victim dies.

Web Summary : A shocking Delhi incident shows a man collapsing, and instead of help, two thieves steal his phone. They returned, searched for valuables, and fled when they saw CCTV. The man died due to lack of timely medical assistance. CCTV footage captured the incident.