हिमाचल प्रदेशात पर्यटकांची मोठी गर्दी; प्रचंड वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकली, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 09:21 PM2023-12-25T21:21:43+5:302023-12-25T21:25:01+5:30

पर्यटकांची वाढती संख्या पाहता हिमाचल पोलीस आता ड्रोनद्वारेही पाळत ठेवत आहेत.

Huge tourist rush in Himachal Pradesh; Huge traffic jam, thousands of vehicles stuck, see photo | हिमाचल प्रदेशात पर्यटकांची मोठी गर्दी; प्रचंड वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकली, पाहा फोटो

हिमाचल प्रदेशात पर्यटकांची मोठी गर्दी; प्रचंड वाहतूक कोंडी, हजारो वाहने अडकली, पाहा फोटो

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या काळात डोंगरावर पर्यटकांची ये-जा झपाट्याने वाढली आहे. हिमाचलपासून उत्तराखंडपर्यंत पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशातून भीषण वाहतूक कोंडीचे वेगवेगळे चित्र समोर येत आहे. अटल-टनल, रोहतांग येथे हजारो पर्यटक प्रचंड वाहतूक कोंडीत अडकल्याचे पाहायला मिळाले. अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी देखील होत आहे.

पर्यटकांची वाढती संख्या पाहता हिमाचल पोलीस आता ड्रोनद्वारेही पाळत ठेवत आहेत. दरम्यान, ड्रोनची अशी छायाचित्रेही समोर आली आहेत, ज्यामध्ये हजारो वाहने डोंगरावर रेंगाळताना दिसत आहेत. लाहौल आणि स्पितीमध्ये ड्रोनद्वारे देखरेख करणाऱ्या पोलिसांनी ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. दुसरीकडे, सणासुदीचा हंगाम सुरू होताच हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये भीषण वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

पोलीस अधिकार्‍यांच्या माहितीनूसार, कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्यासाठी आणि पर्यटकांची सुरक्षा आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी लाहौल आणि स्पिती पोलिसांनी ड्रोन पाळत ठेवली आहे. मनाली-रोहतांग राष्ट्रीय महामार्गावरही वाहने रेंगाळताना दिसत आहेत.अटल बोगद्याकडे जाणारा रस्ताही गाड्यांनी भरून गेला आहे.

Web Title: Huge tourist rush in Himachal Pradesh; Huge traffic jam, thousands of vehicles stuck, see photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.