गोव्यात मोठा अपघात टळला! अमरावती एक्सप्रेस ट्रेन रूळावरून घसरली, सर्व प्रवासी सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 02:08 PM2022-01-18T14:08:53+5:302022-01-18T14:14:08+5:30

दूधसागर आणि कारंजोल या भागात घडला अपघात

howrah amaravati express derailed between dudhsagar and caranzol in goa no casualty | गोव्यात मोठा अपघात टळला! अमरावती एक्सप्रेस ट्रेन रूळावरून घसरली, सर्व प्रवासी सुरक्षित

गोव्यात मोठा अपघात टळला! अमरावती एक्सप्रेस ट्रेन रूळावरून घसरली, सर्व प्रवासी सुरक्षित

Next

वास्को दी गामा हावडा अमरावती एक्सप्रेस (Vasco-Da-Gama Howrah Amaravati Express) मंगळवारी सकाळी रूळावरून घसरल्याची घटना घडली पण सुदैवाने मोठा अपघात टळला. एक्सप्रेस ट्रेन गोव्यात असताना हा अपघात घडला. दूधसागर आणि कारंजोल या भागात ट्रेनच्या लोको इंजिन डब्याची पुढची चाकं रेल्वे रूळावरून खाली घसरली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाल्याची किंवा मृत्यूमुखी पडल्याची माहिती नाही. सर्व प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली असून हा मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच, एक आरटी ट्रेन (Accident Relief Train) दूधसागरला पाठवण्यात आली आहे.

याआदी पश्चिम बंगालमध्ये मैनागुडी येथे मागच्या गुरूवारी गुवाहटी-बिकानेर एक्सप्रेस ट्रेनचा अपघात झाला होता. पाटण्याहून गुवाहटीला जाणारी ट्रेन दोमोहानी रेल्वे स्टेशननजीक रूळावरून घसरली होती. त्यामुळे मोठा अपघात झाला होता. NDRF चे महासंचालक अतुल करवल यांनी सांगितलं होतं की बीकानेर-गुवाहटी एक्सप्रेस ट्रेनचे १२ डब्बे रूळावरून खाली घसरले. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून जास्त जण जखमी झाले.

आजदेखील अशाच प्रकारचे लोको इंजिन रूळावरून खाली उतरले पण सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही. दोन दिवस आधी बंगालच्या सियालदह डीव्हिजनमध्ये दत्तपुकूर लोकल ट्रेनचादेखील मोठा अपघात होणार होता, पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला. मोटरमनच्या समयसूचकेमुळे मोठा अपघात टळला होता.

Web Title: howrah amaravati express derailed between dudhsagar and caranzol in goa no casualty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app