हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 18:39 IST2024-10-06T18:38:42+5:302024-10-06T18:39:20+5:30
एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी अर्थात रविवारी नायब सैनी यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, हरियाणात भाजप सरकार स्थापन होत असल्याचे म्हटले आहे.

हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
पंचकुला - हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर शनिवारी सायंकाळी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. एक्झिट पोलमध्ये भाजपला जोरदार झटका बसत असल्याचे चित्र आहे. भाजपला 20-28 जागा मिळण्याची शक्यता या एक्झिट बोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. अर्थात भाजप सत्तेपासून बराच दूर दिसत आहे. कारण हरियाणामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कुठल्याही पक्षाला 46 जागांची आवश्यकता आहे.
एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी अर्थात रविवारी नायब सैनी यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, हरियाणात भाजप सरकार स्थापन होत असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर आपण पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहोत, असेही सैनी यांनी म्हटले आहे.
आमच्याकडे सरकार स्थापनेची सर्व व्यवस्था -
नायब सैनी म्हणाले, आम्हाला पूर्ण बहुमत मिळत आहे. सरकार स्थापनेची सर्व व्यवस्था आमच्याकडे आहे. गरज भासल्यास आम्ही इतर पक्षांशीही बोलू शकतो. आयएनएलडी, जेजेपी आणि अपक्षांच्या पर्यायांचाही विचार केला जाऊ शकेल.
हरियाणा में ऐसे बनेगी बीजेपी की सरकार pic.twitter.com/z3APJ4WPrl
— sushil kumar (@sushil1641993) October 6, 2024
एक्झिट पोलच्या आकड्यांवर काँग्रेस खूश -
याचवेळी, एक्झिट पोलच्या आकड्यांवर काँग्रेस खूश दिसत आहे. या आकडेवारीनुसार काँग्रेस हरियाणात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे. काँग्रेसला 50-58 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, खरे चित्र 8 ऑक्टोबरलाच स्पष्ट होईल.
2005 ते 2014 या कालावधीत काँग्रेसची सत्ता -
राज्यात 2005 ते 2014 या कालावधीत काँग्रेसचे सरकार होते. यानंतर गेली 10 वर्षे भाजपची सत्ता आहे. एक्झिट पोलनुसार, काँग्रेसला बहुमतासाठी लागणाऱ्या जागांपेक्षाही कितीतरी अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.