बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 17:54 IST2025-11-14T17:39:50+5:302025-11-14T17:54:21+5:30
आज बिहार निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, या निवडणुकीत आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. बिहारमध्ये एनडीए मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, या निवडणुकीत आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे मैदानात आहेत. मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीत लांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना आतापर्यंत ९,७४६ मते मिळाली आहेत. दरम्यान, जमालपूर येथील जेडीयूचे नचिकेत यांनी ५२,७७९ मते मिळवून निर्णायक आघाडी घेतली आहे. नरेंद्र कुमार यांना ३२,८४३ मते मिळाली आहेत.
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
जमालपूर मतदारसंघातील समीकरणे बदलली
जमालपूर विधानसभेमधील राजकीय समीकरणे यावेळी पूर्णपणे बदलली आहेत. जेडीयूने मोठी खेळी करत माजी मंत्र्यांना तिकीट नाकारले आणि नचिकेता मंडल यांना उमेदवारी दिली. तिकीट नाकारल्यामुळे माजी मंत्र्यांनी अपक्ष निवडणूक लढवली.
महाआघाडीच्या बाजूने, आयआयपी पक्षाचे नरेंद्र तांती दलित-महादलित मतपेढी आणि संघटनात्मक ताकदीवर अवलंबून राहून या जागेवरून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा प्रभाव आणि लोकप्रियता आहे, दुसरीकडे, जेडीयूच्या नवीन रणनीती आहेत आणि तिसऱ्या बाजूला, महाआघाडीची ताकद आहे.
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली
बिहारच्या 'हॉट सीट' पैकी एक असलेल्या राघोपूरमध्ये तेजस्वी यादव बऱ्याचदा पिछाडीवर पडत चालले होते. परंतू, अखेरच्या मतमोजणीच्या फेऱ्यांमध्ये मोठा उलटफेर झाला असून २२ व्या फेरीअखेर तेजस्वी यांनी ८५२३ तर २३ व्या फेरीअखेर ११४८१ मतांनी आघाडी मिळविली आहे.
या आघाडीमुळे आता तेजस्वी यादवांचा विजय निश्चित मानला जात आहे. सतत पिछाडीवर असलेल्या तेजस्वींनी भाजपच्या सतीश कुमार यांना मागे टाकले आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना सातत्याने पिछाडीवर ठेवल्यामुळे लालू कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, मतमोजणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात तेजस्वी यादव यांनी जबरदस्त कामगिरी करत ही पिछाडी भरून काढली आणि भाजपच्या उमेदवारावर मोठी आघाडी घेतली आहे.