महाराष्ट्रात वाघ किती उरलेत? व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर, शेजारची राज्ये पुन्हा पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 05:13 PM2023-07-29T17:13:13+5:302023-07-29T17:13:38+5:30

जंगले कमी होऊ लागली आहेत, त्यातच वन्य प्राण्यांची शिकारही होत आहे. अशावेळी वाघ, सिंह यांना जगवण्याची जबाबदारी सरकारांवर येऊन पडली आहे.

How many tigers are left in Maharashtra? Statistics of tiger census announced, neighboring states again ahead... | महाराष्ट्रात वाघ किती उरलेत? व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर, शेजारची राज्ये पुन्हा पुढे...

महाराष्ट्रात वाघ किती उरलेत? व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर, शेजारची राज्ये पुन्हा पुढे...

googlenewsNext

केंद्र सरकारने व्याघ्रगणनेची आकडेवारी जारी केली आहे. यामध्ये मध्य प्रदेशात 785 वाघ असून देशात हे राज्य प्रथम क्रमांकावार आहे. मध्य प्रदेशने टायगर स्टेटचा दर्जा कायम ठेवला आहे. दुसऱ्या स्थानावर कर्नाटकचा नंबर आहे. 

जंगले कमी होऊ लागली आहेत, त्यातच वन्य प्राण्यांची शिकारही होत आहे. अशावेळी वाघ, सिंह यांना जगवण्याची जबाबदारी सरकारांवर येऊन पडली आहे. महाराष्ट्रात उत्तराखंडपेक्षाही कमी वाघ आहेत. उत्तरा खंडमध्ये आणि कर्नाटकात कांटे की टक्कर आहे. उत्तराखंडमध्ये 560 तर कर्नाटकमध्ये 563 आढळले आहेत. तर महाराष्ट्रात ४४४ वाघ आढळले आहेत. 

केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी शनिवारी 2022 व्याघ्रगणनेची राज्यवार आकडेवारी जाहीर केली. नवीन व्याघ्रगणनेच्या आकडेवारीत 785 वाघांसह, मध्य प्रदेश हे देशातील सर्वाधिक वाघ असलेले राज्य आहे. यावरून वाघांच्या संवर्धनासाठी मध्य प्रदेशची बांधिलकी दिसून येते, असे ते म्हणाले. 

वाघ वाढले की कमी झाले...

2006 मध्ये व्याघ्र संवर्धनाच्या प्रयत्नांना वेग आला. तेव्हापासून वाघांची संख्या सातत्याने वाढत आहे. 2006 मध्ये 300 वाघांसह सर्वाधिक वाघ असलेले मध्य प्रदेश हे राज्य होते. 2010 मध्ये ते 257 पर्यंत कमी झाले आणि नंतर मध्य प्रदेशचा वाघ राज्याचा दर्जा कर्नाटकने काढून घेतला होता. 2018 मध्ये, मध्य प्रदेशने पुन्हा एकदा कर्नाटककडून वाघ राज्याचा दर्जा हिरावून घेतला. आता मध्य प्रदेश आणि कर्नाटकमधील फरक 2018 मधील दोन वाघांवरून 2022 मध्ये 222 पर्यंत वाढला आहे.

Web Title: How many tigers are left in Maharashtra? Statistics of tiger census announced, neighboring states again ahead...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ