शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 14:46 IST

Amit Shah Kushinagar Rally: "भाजप आणि एनडीएचा विजय निश्चित आहे. 4 जूनला दुपारी विरोधक पराभवाचे खापर EVM वर फोडतील.

Amit Shah Kushinagar Rally: लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी सर्वच पक्षांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार टीका केली. तसेच, या दोन्ही पक्षांना निवडणुकीत किती जागा मिळणार, हेदेखील सांगितले. 

अमित शाह म्हणाले की, "लोकसभेचे सहा टप्प्यातील मतदान संपले आहे. माझ्याकडे 5 टप्प्याची आकडेवारी आहे. नरेंद्र मोदींनी 5 टप्प्यातच 310 जागांचा टप्पा पार केला आहे. सातवा टप्पा होणार आहे, ज्यामध्ये 400 पार करायचे आहे. राहुल गांधींचा पक्ष 40 चा आकडाही पार करू शकणार नाही. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला तर यूपीमध्ये 4 जागादेखील मिळणे अवघड आहे," असा दावा अमित शाहंनी केला.

EVM वर खापर फोडणार- शहाशाह पुढे म्हणाले, "भाजप आणि एनडीएचा 4 जूनला विजय निश्चित आहे. 4 जूनला दुपारी राहुलबाबाचे लोक पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएममुळे आमचा पराभव झाल्याचे म्हणतील. पराभवाचे खापरही खरगे साहेबांवरच पडेल. विरोधक सरकार आल्यावर मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाषा करत आहेत. ते चुकून जिंकले तरी मागास, अतिमागास आणि दलितांचे आरक्षण काढून मुस्लिमांना देतील. कर्नाटक आणि हैदराबादमध्ये त्यांनी जे काही केले, तेच त्यांनी बंगालमध्ये केले, परंतु तेथे (बंगाल) उच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली. मुस्लिम आरक्षण संविधानानुसार नाही. आपल्या व्होट बँकेला खूश करण्यासाठी ते मुस्लिम आरक्षणाचे आश्वासन देत आहेत. त्याचे थेट परिणाम मागासवर्गीयांना भोगावे लागतील." 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवNarendra Modiनरेंद्र मोदी