शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात कचरा निघतो किती आयुक्तांना पडला प्रश्न: सर्वेक्षणाची गरज स्वच्छतेची ऐशीतैशी:भाग?1

By admin | Updated: August 28, 2015 23:37 IST

सोलापूर : सोलापुरात दररोज कचरा किती साठतो याचे नेमके उत्तर आरोग्य विभागाला न देता आल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील चिंतित झाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाल्याने आता पहिल्यांदा सोलापूर स्वच्छतेवर भर द्यावा लागणार आहे. समीक्षाचा प्रश्न निकाली न निघाल्याने शहर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.

सोलापूर : सोलापुरात दररोज कचरा किती साठतो याचे नेमके उत्तर आरोग्य विभागाला न देता आल्याने आयुक्त विजयकुमार काळम-पाटील चिंतित झाले आहेत. स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश झाल्याने आता पहिल्यांदा सोलापूर स्वच्छतेवर भर द्यावा लागणार आहे. समीक्षाचा प्रश्न निकाली न निघाल्याने शहर स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत.
समीक्षाने काम बंद केल्यावर जानेवारी 2015 पासून महापालिकेने पूर्वीप्रमाणेच स्वबळावर कचरा उचलण्याचा निर्णय घेतला. पण या कामाचे नियोजन अद्याप जमले नाही. विभागनिहाय आठ ठेकेदार नेमून कचरा उचलला जात आहे. वजनावर ठेकेदारांना पैसे दिले जात आहेत. लाखो रुपये खचरूनही शहरातील घाण हटलेली नाही. पावसाळ्याचे दिवस व रस्त्यावर कचरा साठल्याने रोगराईचा धोका वाढला आहे. त्यामुळे आयुक्त काळम-पाटील यांनी घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत केले असले तरी त्यांनाही नेमकी माहिती दिली जात नाही. शहरात दररोज 350 टन कचरा निघतो व त्यापैकी 250 टन कचरा उचलला जातो असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दररोज उरलेल्या 100 टन कचर्‍याचे काय होते असा प्रश्न खुद्द आयुक्तांना पडला आहे. असे झाले तर आत्तापर्यंत सर्वत्र कचरा साठून राहायला हवा होता. कचरा नेमका निघतो किती यावर अभ्यास करण्यासाठी कचर्‍यापासून वीज निर्मिती करणार्‍या ठेकेदाराला सुचित करण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांचे व्यवस्थित परीक्षण होत नसल्याने कचरा गोळा करण्यात गडबडी होत आहेत. घंटागाड्या आहेत पण पूर्वीसारखे त्यांच्याकडून काम होत नसल्याचे दिसून आले आहे. आयुक्तांनी मायक्रो प्लॅनिंग करूनही ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे गाड्या धावत नाहीत. ठराविक ठिकाणी या गाड्या जात असल्याचे दिसून आले आहे.
ठेकेदारांची बनवाबनवी
आठ ठेकेदारांमार्फत शहरातील कचरा उचलला जातो. ठेकेदार जेसीबीद्वारे कचरा उचलतात. यामुळे शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. कचर्‍यात माती जाते व पर्यायाने कचर्‍याचे वजन वाढते. काट्यावर वजन करण्यासाठी गाडी नेण्यापूर्वी ठेकेदार गाडीत पाणी ओतत असल्याचा प्रकार उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी उघडकीस आणला आहे.