शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नोटांच्या निर्णयाबाबत मोदींनी कशी ठेवली गोपनीयता?

By admin | Updated: November 11, 2016 04:28 IST

सध्याचा काळच असा आहे की, येथे कुठलीही बातमी लपून राहत नाही. पण, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवरील बंदीबाबत मात्र मोदी सरकारने प्रचंड गोपनीयता बाळगल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली : सध्याचा काळच असा आहे की, येथे कुठलीही बातमी लपून राहत नाही. पण, ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवरील बंदीबाबत मात्र मोदी सरकारने प्रचंड गोपनीयता बाळगल्याचे दिसून येत आहे. अगदी मोदी सरकारमधील बहुतांश मंत्र्यांनासुद्धा निर्णय जाहीर होण्याच्या अगदी काही वेळापूर्वीच या निर्णयाची माहिती समजली, असे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे, तर दूरदर्शनवरून मोदी यांनी हा निर्णय जाहीर करेपर्यंत सर्व मंत्र्यांना कॅबिनेटची बैठक जिथे झाली, तिथेच बसवून ठेवण्यात आले होते. त्यांच्यामार्फत ही माहिती आधीच बाहेर कळू नये, असा त्यामागील उद्देश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवारी कॅबिनेटची बैठक झाली. बैठकीला हजर असलेल्या बहुतांश मंत्र्यांना नोटांबाबतच्या निर्णयाची पुसटशी कल्पनाही नव्हती. कुठल्याही परिस्थितीत ही माहिती लिक होऊ नये याची दक्षता घेण्यात आली होती. मोदी यांच्या भाषणानंतरच संबंधित अधिकारी आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी यावर भाष्य केले.कॅबिनेटची मंगळवारी जी बैठक झाली त्या बैठकीच्या विषयपत्रिकेवर पंतप्रधान मोदी यांचा जपान दौरा आणि त्या वेळी होणारे संभाव्य करार हाच विषय होता. दरम्यान, सचिवालयाने काही दिवसांपूर्वीच जारी केलेल्या एका परिपत्रकानुसार, मंत्र्यांच्या वैयक्तिक स्टाफला बैठकीसाठी मोबाइल फोन घेऊन जाता येणार नाहीत, असे यात म्हटले होते. अर्थातच, हा निर्णय मंत्र्यांसाठीही होता. नोटांचा निर्णय आणि घटनाक्रम...

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणण्यात येत असल्याची माहिती या मंत्र्यांनाही नव्हती. ही बैठक सुरू होण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर या निर्णयाचे संकेत मंत्र्यांना देण्यात आले, असे एका मंत्र्यानी सांगितले. हे सर्व मंत्री बैठकीच्या हॉलमध्ये ६.४५ ते मोदींचे भाषण संपेपर्यंत म्हणजे ९पर्यंत येथेच होते, असेही या मंत्र्याने सांगितले. कॅबिनेटची ही बैठक 7.30 वाजता संपली. कॅबिनेटच्या बैठकीनंतर या निर्णयाची माहिती देण्यासाठी मोदी हे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटण्यासाठी गेले. मोदी यांनी याच दिवशी रात्री उशिरा तीन मंत्र्यांसोबत बैठक घेतल्याचेही सांगण्यात येते.