गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:55 IST2025-07-16T13:52:55+5:302025-07-16T13:55:28+5:30
'गेल्या १५ वर्षांत मी सुमारे २० देशांमध्ये गेली आहे. माझी मुले वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आली. मी डॉक्टर किंवा रुग्णालयांच्या मदतीशिवाय त्यांची प्रसूती स्वतः केली, कारण मला हे सर्व माहित होते, अशी माहिती रशियन महिलेने दिली.

गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
कर्नाटकातील गोकर्णमधील एका गुहेत रशियन महिला तिच्या मुलांसह राहत असल्याची सापडली आहे. या प्रकरणी आता नवीन माहिती समोर येत आहे. २०१७ मध्ये तिचा व्हिसाची मुदत संपली होती, पण ती भारतातच राहिली. तिच्यासोबत ६ आणि ८ वर्षांच्या दोन मुली आहेत. जवळच्या व्यक्तीला गमवण्यासह अनेक कारणे आहे, या कारणांमुळे मी रशियाला परतली नाही, असे या महिलेने सांगितले आहे.
रशियन महिलेने सांगितले की, "गेल्या १५ वर्षांत मी सुमारे २० देशांमध्ये गेली आहे. माझी मुले वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आली आहेत. मी डॉक्टर किंवा रुग्णालयांच्या मदतीशिवाय स्वतः प्रसूती केली कारण मला हे सर्व माहिती होते. कोणीही मला मदत केली नाही. मी ते एकटीने केले आहे.
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
गुहेत राहण्याचे कारणेही सांगितली...
"आम्ही सूर्योदयाबरोबर उठायचो, नद्यांमध्ये पोहायचो आणि निसर्गाच्या सानिध्यात राहायचो. हवामानानुसार मी शेकोटीवर किंवा गॅस सिलेंडरवर स्वयंपाक करायची आणि जवळच्या गावातून वस्तू विकत घ्यायचो. आम्ही रंगकाम करायचो, गाणी म्हणायचो, पुस्तके वाचायचो आणि शांततेत राहायचो, असे रशियन महिलेने सांगितले.
"आता आम्हाला अस्वस्थ परिस्थितीत ठेवण्यात आले आहे. ही जागा घाणेरडी आहे. येथे कोणतीही गोपनीयता नाही आणि आम्हाला फक्त साधा भात खायला मिळतो. आमचे बरेच सामान काढून घेण्यात आले आहे, यामध्ये नऊ महिन्यांपूर्वी मृत्युमुखी पडलेल्या आमच्या मुलाच्या राखेचाही समावेश आहे,"असेही ती म्हणाली.
पैसा कुठून मिळायचा
रशियन महिलेने पैसा कसा मिळायचा यावर बोलताना सांगितले की, कला आणि संगीत व्हिडीओ बनवून आणि कधीकधी शिकवून किंवा बाळांची देखभाल करून पैसे कमवत होते.'मी या सर्व कामांमधून पैसे कमवत असे आणि जर माझ्याकडे कोणतेही काम नसले किंवा मला कामाची गरज नसलेली एखादी व्यक्ती सापडली नाही तर माझा भाऊ, माझे वडील आणि माझा मुलगा देखील मदत करायचे. आम्हाला जे काही हवे होते, त्यानुसार आमच्याकडे पुरेसे पैसे होते.'
जवळचे सोडून गेले म्हणून परत गेली नाही....
रशियन महिला म्हणाली की, अनेक जवळच्या लोकांचे निधन हे एक कारण होते. आम्हाला सतत दुःख, कागदपत्रे आणि इतर समस्यांनी वेढले होते.' आम्ही आणखी ४ देशांचा प्रवास केला आहे आणि भारतात परतली आहे, 'कारण आम्हाला भारत आणि येथील वातावरण, तसेच येथील लोकही खूप आवडली आहेत. ती महिला आता रशियन दूतावासाच्या संपर्कात आहे.