शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला; पोलीस शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 16:54 IST

terrorist attack on bjp leader house: गेल्या चार दिवसात राजकीय नेत्यावर झालेला दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

ठळक मुद्देभाजप नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्लाश्रीनगरच्या नौगाम परिसरातील घटनादहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस कर्मचारी शहीद

श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर येथे गुरुवारी सकाळी एक दहशतवादी हल्ला झाला. श्रीनगरमध्ये असलेल्या नौगाम परिसरात एका भारतीय जनता पक्ष (BJP) नेत्याच्या घरावर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. दहशदवाद्यांनी हल्ल्यानंतर पळून जाताना सुरक्षारक्षकाची रायफलही पळवून नेली असून, या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्याला हौतात्म्य आले आहे. (terrorist attack on bjp leader house in nowgam area of srinagar jammu and kashmir)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नौगामच्या अरीबागमध्ये राहणारे भाजप नेते अनवर खान यांच्या घरावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी गोळीबार करत खान यांच्या घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात घराबाहेरील गार्ड पोस्टवरील पोलीस कर्मचारी रमीज राजा गंभीर जखमी झाले, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

दहशतवाद्यांना पळ काढण्यात यश

दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा अनवर खान घरात नव्हते. या गोळीबारात जखमी झालेल्या रमीज राजा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. दहशतवादी पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करुन त्याची रायफल घेऊन पळाले, असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस आणि सैन्याचे जवान घटनास्थळी

गेल्या चार दिवसात राजकीय नेत्यावर झालेला दुसरा दहशतवादी हल्ला आहे. नौगाम भागात दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलीस आणि सैन्याचे जवान घटनास्थळी पोहोचले. हशतवाद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी आणि सैन्याच्या जवानांनी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, आसपासच्या परिसरात चौकशी करण्यात येत आहे. 

प्रगती का हायवे! महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी; नितीन गडकरींची घोषणा

दरम्यान, सोपोरमध्ये बीडीसी चेअरपर्सन असलेल्या फरीदा खान यांच्यावर सोमवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एका PSO सह दोन लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या फरीदा खान यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाPoliceपोलिस