शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
4
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
5
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
6
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
7
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
8
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
9
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
10
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
11
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
12
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
13
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
14
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
15
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
16
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
17
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
18
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
19
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
20
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल्स हाऊसफुल्ल; ‘आप’ कार्यकर्त्यांची रीघ

By admin | Updated: February 14, 2015 00:48 IST

अरविंद केजरीवाल यांच्या आज होणाऱ्या शपथविधीसाठी आम आदमी पार्टीचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत गोळा होत असल्याने हॉटेल्स हाऊसफुल्ल झालीे

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या आज होणाऱ्या शपथविधीसाठी आम आदमी पार्टीचे देशभरातील कार्यकर्ते दिल्लीत गोळा होत असल्याने हॉटेल्स हाऊसफुल्ल झालीे असून खोल्यांच्या दरात भरमसाठ म्हणजे किमान २०० टक्के वाढ झाली आहे.पहाडगंज, करोलबागमधील हॉटेल्सचे सर्वसाधारण दर ५०० ते १२०० रुपये असून दिल्लीला भेटी देणारे पर्यटक स्वस्त दरांमुळे या भागातील हॉटेल्सला पसंती देत असतात, पण गेल्या दोन दिवसांत दर २५०० वर गेले आहेत. सध्या मुलांच्या परीक्षेचे दिवस असल्यामुळे हॉटेल्सचे दर ५०० ते ७०० रुपयांच्या घरात होते, मात्र अचानक गेल्या दोन दिवसांत भाव घसघशीत वाढले आहेत. बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या निवासाची पक्षाने व्यवस्था केलेली नसून ती त्यांनी स्वत:च करावी असे सांगण्यात आले आहे. नेमके किती कार्यकर्ते येतील याचा अंदाज लावता येणे अशक्य आहे. देशभरातून किमान २० हजारांवर कार्यकर्ते येतील अशी अपेक्षा असल्याचे आपच्या एका नेत्याने सांगितले.राष्ट्रपती राजवट मागेकेंद्राने शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे दिल्लीतील राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची शिफारस केली . आयोगाने नवनिर्वाचित आमदारांची यादी जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाला. गेल्यावर्षी केजरीवालांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर १७ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.४० हजार लोकांची व्यवस्था...शपथविधीसाठी सुमारे ४० हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून व्हीआयपींसाठी खास दीर्घा बनविण्यात आल्या आहेत. मैदानावर सर्वत्र मोठ्या स्क्रीनवर कार्यकर्त्यांना शपथविधी सोहळा बघता येऊ शकेल. याआधी २८ डिसेंबर २०१३ रोजी केजरीवालांच्या शपथविधीला एक लाखावर लोक आले होते. गेल्यावर्षी १४ फेब्रुवारी रोजीच त्यांनी राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे केजरीवालांच्या पहिल्या शपथविधीचा वार शनिवारच होता.संपूर्ण दिल्ली ‘आप’लीकेजरीवालांनी राजकीय पक्षांना सरसकट निमंत्रण नाकारत भेदभावाला स्थान दिलेले नाही; मात्र पक्षाला दिलेला अभूतपूर्व पाठिंबा बघता संपूर्ण दिल्लीलाच निमंत्रण देत त्यांनी दिल्ली ‘आप’ली असल्याचे दाखवून दिले आहे. ‘‘सर्वांना अधिकार देणे माझे कर्तव्यच आहे. कृपया शपथविधीला या, कारण मी नव्हे तर तुम्ही सर्व जण मुख्यमंत्री बनत आहात’’असे आवाहन त्यांनी जाहिरातींतून केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)