भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:56 IST2025-10-18T12:54:39+5:302025-10-18T12:56:15+5:30
एका २० वर्षीय तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले
उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यात एका २० वर्षीय तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मऊआइमा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही अजब आणि विचित्र घटना घडली असून, झोपेत असताना कोणीतरी तरुणाचा खासगी अंग कापून पसार झाले.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, २० वर्षांचा हा तरुण रात्री आपल्या घरात गाढ झोपलेला असताना अज्ञात व्यक्तीने धारदार वस्तूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. सकाळी जेव्हा तरुणाला जाग आली, तेव्हा त्याला तीव्र वेदना होत होत्या. खोलीत त्याला कोणीही दिसले नाही. रक्ताच्या थारोळ्यात असलेला आणि वेदनांनी विव्हळणारा तो तरुण कसाबसा त्याच्या भावाच्या खोलीत पोहोचला आणि त्यानंतर तो तिथेच बेशुद्ध पडला.
गावकरी आणि पोलीस गोंधळात
झोपेत घडलेल्या या अजीबोगरीब घटनेमुळे कुटुंबातील सदस्य आणि गावकरी पूर्णपणे हादरून गेले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिसरात लोकांची मोठी गर्दी जमली, मात्र हल्ला करणारा आरोपी कोण होता, याचा कोणताही सुगावा लागला नाही.
पाच भाऊ आणि दोन बहिणींमध्ये होता लहान
घटनेची माहिती मऊआइमा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला, परंतु आरोपींचा शोध त्यांनाही लागला नाही. पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्याचे लग्न झालेले नव्हते आणि तो पाच भाऊ व दोन बहिणींमध्ये सर्वात लहान होता. तो घरात वेगळ्या खोलीत झोपत असे. त्याचा प्रायव्हेट पार्ट कोणी कापला, याचे गूढ अद्याप कायम आहे. कुटुंबीयांनी तातडीने पीडित तरुणाला शहरातील स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात दाखल केले आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत.