Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 18:22 IST2025-10-23T18:20:23+5:302025-10-23T18:22:26+5:30
Petrol cracker blast viral video: धोकादायक 'ट्रेंड' फॉलो करणे तरुणाच्या चांगलेच अंगलट आले.

Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!
केवळ व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्याच्या नादात तीन तरुणांनी पेट्रोलने भरलेल्या पिशवीवर फटाका फोडण्याचा प्रयत्न केला. यात फटाक्याच्या स्फोटानंतर उसळलेल्या आगीत एक तरुण गंभीररित्या भाजला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा धोकादायक ट्रेंड सोशल मीडियावरून व्हायरल झाला आहे, जिथे लोक ट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तीन तरुण एकत्र बसलेले दिसतात. त्यांनी मध्यभागी एका पिशवीत पेट्रोल ठेवले आणि त्यावर एक फटाका ठेवला. पेट्रोलच्या पिशवीवर फटाका पेटवल्यानंतर, हे तिघेही तरुण तिथून दूर पळून गेले. फटाका फुटताच पेट्रोलच्या पिशवीतून मोठ्या ज्वाला उसळल्या. दुर्दैवाने, स्फोटातून निघालेल्या काही ज्वाला जवळ उभ्या असलेल्या त्या तरुणावर पडल्या. स्वतःला वाचवण्यासाठी तरुण पळू लागला. जवळच्या लोकांनी धाव घेऊन त्या तरुणाच्या अंगावर लागलेली आग विझवली. या घटनेमध्ये तो तरुण गंभीररित्या भाजला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, सोशल मीडियावरील कोणताही धोकादायक ट्रेंड केवळ मनोरंजन नसतो, तो जीवावर बेतू शकतो. तरुणांनी 'रील' किंवा व्हिडिओ बनवण्याच्या नादात अशा धोकादायक गोष्टींना हलक्यात घेऊ नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये, असा धडा या घटनेतून मिळतो. स्थानिक पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.