अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट! नातं तोडलं म्हणून प्रेयसीला जिवंत जाळलं, स्वत:ही पेटवून घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 09:07 IST2026-02-19T09:06:26+5:302026-02-19T09:07:40+5:30

Telangana Mahabubabad Shocking: तेलंगणाच्या महाबूबाबाद जिल्ह्यात  एका व्यक्तीने संशयापोटी आपल्या प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वतःलाही पेटवून घेतले.

Horrible end to immoral relationship! Married woman burned alive after breaking off relationship, sets herself on fire too | अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट! नातं तोडलं म्हणून प्रेयसीला जिवंत जाळलं, स्वत:ही पेटवून घेतलं

अनैतिक संबंधांचा भयंकर शेवट! नातं तोडलं म्हणून प्रेयसीला जिवंत जाळलं, स्वत:ही पेटवून घेतलं

तेलंगणाच्या महाबूबाबाद जिल्ह्यात बुधवारी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादातून एका व्यक्तीने आपल्या विवाहित प्रेयसीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर स्वतःलाही पेटवून घेतले. या भीषण घटनेत दोघेही गंभीररीत्या होरपळले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित महिलेला दोन मुले आहेत, तर आरोपीला तीन मुले असून या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर आभाळ कोसळले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

आरोपी कुंटा अंजैया (रा. मोडुगुलागुडेम) हा महाबूबाबाद कृषी बाजारासमोर दुधाचा स्टॉल चालवतो. दोन वर्षांपूर्वी पत्नीच्या निधनानंतर त्याचे एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पीडित महिला त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय अंजैयाला होता. याच संशयातून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. बुधवारी पीडित महिला आपल्या आईच्या घरी गेल्याची माहिती मिळताच, अंजैया पेट्रोलची बाटली घेऊन तिथे पोहोचला. तिथे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. महिलेने त्याच्याशी असलेले संबंध तोडण्यास स्पष्ट शब्दात सांगितले, ज्याचा राग अनावर होऊन अंजैयाने हे टोकाचे पाऊल उचलले.

भांडण विकोपाला गेल्यावर अंजैयाने पीडितेच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला आग लावली. प्रेयसीला पेटवल्यानंतर त्याने क्षणाचाही विचार न करता स्वतःवरही पेट्रोल ओतून पेटवून घेतले. आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांचीही प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : अनैतिक संबंधों का भयानक अंत: संबंध तोड़ने पर विवाहिता को जिंदा जलाया, खुद को भी आग लगाई

Web Summary : तेलंगाना में एक व्यक्ति ने विवाहित प्रेमिका के संबंध तोड़ने पर उसे जिंदा जला दिया, फिर खुद को भी आग लगा ली। दोनों गंभीर रूप से घायल हैं। महिला के दो बच्चे हैं, पुरुष के तीन, जिससे दोनों परिवार तबाह हो गए। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Infidelity's Horrific End: Woman Burned Alive for Ending Affair; Perpetrator Self-Immolates

Web Summary : In Telangana, a man burned his married lover alive after she ended their affair, then self-immolated. Both are critically injured. The woman has two children, the man three, devastating both families. Police are investigating.