महाकुंभासाठी आलेल्या नेपाळच्या यात्रेकरूंची बस उलटली; गुटखा खाण्यासाठी ड्रायव्हरने सोडलं स्टेअरिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 19:26 IST2025-02-15T19:08:40+5:302025-02-15T19:26:42+5:30

नेपाळहून आलेल्या भाविकांच्या बसला उत्तर प्रदेशात मोठा अपघात झाला.

Horrible accident in Ghazipur bus from of Nepal pilgrims overturned one dead 24 injured | महाकुंभासाठी आलेल्या नेपाळच्या यात्रेकरूंची बस उलटली; गुटखा खाण्यासाठी ड्रायव्हरने सोडलं स्टेअरिंग

महाकुंभासाठी आलेल्या नेपाळच्या यात्रेकरूंची बस उलटली; गुटखा खाण्यासाठी ड्रायव्हरने सोडलं स्टेअरिंग

Ghazipur Accident: महाकुंभ मेळ्यासाठी देशभरातून भाविक प्रयागराज येथे येत आहेत. त्यामुळे प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच प्रयागराजला रस्ते मार्गाने पोहोचणाऱ्या अनेक भाविकांच्या वाहनांना अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच शनिवारी नेपाळहून महाकुंभ स्नानासाठी आलेल्या प्रवाशांनी भरलेली बस उत्तर प्रदेशातील गाझीपूर वाराणसी महामार्गावर उलटल्याची घटना समोर आली. या अपघातात बसमध्ये प्रवास करणारे २५ प्रवासी गंभीर जखमी झाले होते. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. आता चालकाच्या चुकीमुळे हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी पहाटे महाकुंभासाठी नेपाळहून आलेल्या प्रवाशांनी भरलेल्या बसला गाझीपूर वाराणसी महामार्गावरील मिरानापूर गावाजवळ अपघात झाला.  आसपासच्या गावकऱ्यांनी आणि पोलिसांच्या मदतीने सर्व २५ जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यातील एका प्रवाशाचा मृत्यू झाला, तर २४ प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. एका प्रवाशाचा हात कापला गेल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीय.

नेपाळमधील बारा जिल्ह्यातील भाविकांच्या बसचालकाने आधी गुटख्याच्या पाकिटाचा तुकडा फाडून तोंडात टाकला. प्रवाशांनी विरोध करुनही चालकानने दुसरे पॅकेटही उघडले. त्यानंतर स्टेअरिंग सोडले आणि दोन्ही हातांनी गुटखा तोंडात घालण्यास सुरुवात केली. याच दरम्यान बस जोरात पलटली. यानंतर गोंधळ उडाला. मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थही घटनास्थळी धावले आणि सर्व प्रवाशांना मदत करू लागले.

आणखी एका अपघातात १० प्रवाशांचा मृत्यू

दुसरीकडे, मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावर भीषण अपघातात बोलेरो आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला तर १९ जण जखमी झाले. बस आणि बोलेरोमधील ही धडक एवढी भीषण होती की त्यात बोलेरोचा चेंदामेंदा झाला. महाकुंभमेळ्यासाठी छत्तीसगड येथून भाविकांना घेऊन जात असलेल्या बोलेरोची बसला धडक बसली. शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास हा अपघात घडला.

Web Title: Horrible accident in Ghazipur bus from of Nepal pilgrims overturned one dead 24 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.