सकाळी हनीप्रीत आणि संध्याकाळी 'मनी'प्रीत, सोशल मीडियावर हास्यकल्लोळ

By Sagar Sirsat | Updated: October 3, 2017 19:24 IST2017-10-03T18:35:18+5:302017-10-03T19:24:05+5:30

राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि संध्याकाळ होईपर्यंत फरार असलेल्या विजय माल्याला अटक करण्यात आल्याचं वृत्त आलं...

'Honeypreet in the morning and' Money 'in the evening; | सकाळी हनीप्रीत आणि संध्याकाळी 'मनी'प्रीत, सोशल मीडियावर हास्यकल्लोळ

सकाळी हनीप्रीत आणि संध्याकाळी 'मनी'प्रीत, सोशल मीडियावर हास्यकल्लोळ

मुंबई - मागच्या महिन्याभरापासून फरार असलेली बाबा राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत इन्सा हिने आज दुपारी (मंगळवारी) पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आणि संध्याकाळ होईपर्यंत लंडनमध्ये भारतातून 9000 हजार कोटीचे कर्ज घेऊन फरार असलेला मद्यसम्राट विजय माल्याला अटक करण्यात आल्याचं वृत्त आलं. माल्याला काही वेळातच लंडनच्या कोर्टाकडून जामीन मिळाला. पण या दोन्ही मोठ्या घडामोडी एकाच दिवशी घडल्याने सोशल मीडियावर चांगलाच हशा पिकला. ट्रोल करण्याची आणि टांग खेचण्याची संधी शोधत बसणा-या ट्रोलक-यांसाठी हा विषय म्हणजे पर्वणीच ठरला आहे. मल्ल्याला अटक करताच ''सकाळी हनीप्रीतला तर संध्याकाळी 'मनी'प्रीतला अटक'' केल्याच्या ट्विटने सर्वांचं लक्ष वेधलं.  त्यानंतर तर एकाहून एक भन्नाट ट्वीट करण्यास सुरूवात झाली आहे. 

एक नजर अशाच काही भन्नाट ट्विट्सवर -














Web Title: 'Honeypreet in the morning and' Money 'in the evening;