२५ डिसेंबरला शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा हप्ता देणार - कृषिमंत्री नरेंद्र तोमर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 07:11 IST2020-12-24T06:11:46+5:302020-12-24T07:11:59+5:30
Agriculture Minister Narendra Tomar : माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मोदी सरकारतर्फे सुशासन दिवस पाळला जातो. याच दिवशी पंतप्रधान एका क्लिकने पैसे थेट खात्यामध्ये पाठविणार असल्याचे कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले.

२५ डिसेंबरला शेतकऱ्यांना सन्मान योजनेचा हप्ता देणार - कृषिमंत्री नरेंद्र तोमर
नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा दोन हजारांचा सातवा हप्ता २५ डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ होत आहे.
माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मोदी सरकारतर्फे सुशासन दिवस पाळला जातो. याच दिवशी पंतप्रधान एका क्लिकने पैसे थेट खात्यामध्ये पाठविणार असल्याचे कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. या योजनेचा दोन हजार रुपयांचा पुढचा हप्ता २५ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. देशभरात १४ कोटी शेतकरी असून, त्यापैकी ११ कोटी ४ लाख शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे.