गृहमंत्री अमित शहांचीसुरक्षा व्यवस्था वाढविली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 02:09 IST2019-06-08T02:09:19+5:302019-06-08T02:09:30+5:30

संवेदनशील अशा गृहमंत्रालयाची सूत्रे गेल्या आठवड्यात शहा यांनी स्वीकारल्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

Home Minister Amit Shahani's security arrangements have been constituted | गृहमंत्री अमित शहांचीसुरक्षा व्यवस्था वाढविली

गृहमंत्री अमित शहांचीसुरक्षा व्यवस्था वाढविली


नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुरक्षा कवच आणखी शक्तिशाली बनविण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी शहा यांच्या निवासस्थानी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संवेदनशील अशा गृहमंत्रालयाची सूत्रे गेल्या आठवड्यात शहा यांनी स्वीकारल्यानंतर त्यांची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. अमित शहा यांच्या सुरक्षेचा आढावा दिल्ली पोलिसांनी घेऊन त्यांच्या निवासस्थानी अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी नेमले असल्याचे वरिष्ठ सुरक्षा अधिकाºयाने सांगितले. शहा यांना सध्या केंद्रीय निमलष्करी दलाचे झेड प्लस सुरक्षाकवच आहे.

अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी दिल्ली पोलिसांकडून आहे. अमित शहा हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी राहत होते त्या बंगल्यात राहायला जाऊ शकतात. त्यांना सुरक्षेच्या कारणावरून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या ब्लॅक कॅट कमांडोजचे संरक्षण दिले जाऊ शकेल.

Web Title: Home Minister Amit Shahani's security arrangements have been constituted